BREAKING NEWS

Friday, November 11, 2016

उद्या चांदुर रेल्वेत निघणार रामधुन प्रभात फेरी - गुरूदेव सेवा सदगुरू मंडळाचे आयोजन


चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-

Displaying IMG_२०१६११११_२०३०२६.JPG
कार्तीक महिन्यानिमीत्य काकडा प्रभात फेरी महोत्सव समाप्ती उद्या  शनिवारी होणार आहे. यानिमित्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा रामधून प्रभात फेरी चे आयोजन स्थानिक गुरूदेव सेवा सदगुरू मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
      ही प्रभात फेरी उद्या सकाळी ८ ते २ या वेळेत स्थानिक मारोती मंदिरातुन काढण्यात येणार आहे. ही प्रभात फेरी मारोती मंदिरजवळुन निघुन सिनेमा चौक, जुना मोटार स्टैंड, अमरावती रोड, डांगरीपुरा, महादेवघाट, माळीपुरा येथुन भ्रमण करून पुन्हा मारोती मंदिरात विसर्जीत होणार आहे. यामध्ये भगवान राम लक्ष्मण व सिता यांच्या शोभायात्रेचा रथ राहील. तसेच भगवान श्रीकृष्ण, बळीराम दादा व हनुमंतराया यांचा सुध्दा रथ राहणार आहे. त्यानंतर २ ते ६ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सुरेश पेठे व इतर सदस्यांनी दिली. या प्रभातफेरीत टेंभुर्णी येथील पद्मावंती महिला भजन मंडळ, स्थानिक डांगरीपुरा येथील गुरूदेव सेवा मंडळ, महालक्ष्मी महिला भजन मंडळ, महादेवघाट येथील आसरा माता मंदिर मंडळ, श्री. गजानन महाराज मंडळ, खडकपुरा येथील युवक मंडळ, खडकपुरा येथील गुरूदेव सेवा मंडळ या दिंड्यांचा समावेश राहणार आहे.  महादेव मंदिराजवळ दहीहांडीचा कार्यक्रमसुध्दा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सर्व भक्त मंडळींनी उपस्थीत राहुन शोभायात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे..
Attachments area

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.