चांदूर रेल्वेः/ शहेजाद खान /--
शेतीच्या कामानिमित्त चांदूर रेल्वे येथे आलेल्या एका पंच्याहत्तर वर्षीय वृध्दाचा हार्ट अटॅकने मृत्यु झाल्याची घटना शनिवारी (ता.१९) दुपारी तहसील कार्यालय समोरील रस्त्यावर घडली. रघुनाथ किसनराव बोडखे (वय ७५) असे त्या वृध्दाचे नाव आहे.
सविस्तर वृत्तानुसार न्यु प्रभात कॉलनी, अमरावती येथील रहिवाशी रघुनाथ किसनराव बोडखे शेतीच्या कामानिमित्त चांदूर रेल्वे येथे आले होते. आज दुपारी अचानक त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास झाला आणि ते खाली कोसळले. त्यावेळी रस्त्यावरील लोकांनी त्यांना तातडीने स्थानिक ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मृतक रघुनाथराव बोडखे यांना आधीपासुन उच्च रक्तदाब, मधुमेह आजार व जुना हृदय विकाराचा त्रास असल्याचे त्यांचा मुलगा संजय रघुनाथ बोडखे व जावई डॉ.नितीन दातीर यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जातून सांगीतले. त्यांच्या मृत्युच्या कारणाबद्दल कोणतीही शंका-कुशंका व आक्षेप नसल्याचे त्यांनी लेखी अर्जात स्पष्ट केले.

Post a Comment