BREAKING NEWS

Sunday, November 13, 2016

हिंदु संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे कठीण नाही ! - मंगेश म्हात्रे, युवा प्रभारी, हिंदू महासभा, नवी मुंबई


श्री मंगेश म्हात्रे
     सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडण्याचा आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून घणसोली येथील एक हनुमानाचे मंदिर पहाटे ३ वाजता पाडण्यात आले. या घटनेनंतर नवी मुंबई हिंदु ब्रेन्स या धर्माभिमान्यांच्या गटाने एक लढा देवासाठी या अंतर्गत मंदिरे वाचवण्याची मोहीम चालू केली. सामाजिक संकेतस्थळांवर, तसेच प्रसारमाध्यमांमध्ये या मोहिमेला चांगली प्रसिद्धी देण्यात आली. नवी मुंबईतील ज्या मंदिरांना महानगरपालिकेने नोटीस दिली होती त्या मंदिरांच्या विश्‍वस्तांची आम्ही भेट घेतली. ग्रामस्थ, वारकरी संप्रदाय तसेच अन्य संघटनांची मिळून नवी मुंबई मंदिर समिती स्थापन करण्यात आली. याद्वारे जी अनधिकृत मंदिरे अधिकृत होऊ शकतात, ती त्वरित अधिकृत करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्यात आला. या संघटनामुळे प्रशासनाने एका मंदिरावर कारवाई करण्याचे पुढे ढकलले. हिंदु संघटनांनी अशाप्रकारे एकत्र येऊन लढा दिला, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे कठीण नाही !

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.