BREAKING NEWS

Saturday, December 17, 2016

पुण्यात एक नंबर अशा पाट्या लावणाऱ्या लोकमत वृत्तपत्राकडून तुकोबांचा अभंगाची "जराशी गंमत" म्हणून क्रुर चेष्टा

सोशल मिडीयावर पोस्ट चा जाहीर निषेध 




पुणे /-   

"लोकमत" सारख्या जबाबदार वर्तमानपत्राने जराशी गंमत म्हणत जगदगुरू तुकाराम महाराजांचा आणि तुकोबांच्या गाथेतील अभंगांचा अपमान केला आहे.आज दिनांक १७ च्या संपादकीय संपूर्ण  आवृत्ती मध्ये लोकमत ने जगदगुरू तुकाराम महाराजांचा एका अभंगाचा गम्मत म्हणून वापर केला आहे याच संदर्भात सोशल मिडिया वर मोठ्या प्रमाणात या गम्मत म्हणून टाकलेल्या अभंगाचा निषेध केल्या जात आहे . जगदगुरू तुकाराम महाराज यांचा एका एका अभंगावर लोक पी.एच.डी. करत आहेत आणि इकडे महाराष्ट्रात व पुण्यात एक नंबर अशा पाट्या लावणारे वर्तमानपत्र तुकोबांची क्रुर चेष्टा करत आहे. सदर पोस्ट चा परिणाम म्हणजे येणाऱ्या काळात नवीन वर्षात असल्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेयर होतात. आपल्यातलेच काही लोक पुढील काही दिवसात अशा पोस्ट whatsapp, facebook वर शेअर करतील.

 पंढरपूर येथील मस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना पंढरपूर  यांनीही या अशा गम्मत म्हणून टाकलेल्या अभंगाचा जाहीर निषेध केला आहे. या बाबत लोकमत वृत्तपत्राने त्यासंबंधी वारकरी संप्रदायाची  माफी मागावी अशी मागणीही जोर धरत आहे 


Share this:

2 comments :

  1. लोकमत कडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते?
    लोकमत वर बहीष्कारच टाकला पाहिजे.

    ReplyDelete
  2. आकाश फाटतय... पण घाबरून कसे चालेल.." मेणाहूनी मऊ . ..हाणू काठी 'तुकोबाच म्हणतात.
    मग लोकशाही मार्गाने हाना ना लाथ !

    ReplyDelete

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.