BREAKING NEWS

Saturday, December 17, 2016

सोनगांव-शिवणी प्रकल्पातील अधिकाऱ्यांची काजू-बादाम पार्टी संतप्त शेतकऱ्यांनी उधळवली

मुख्य अभियंता लांडेकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी काढला पळ
- तलावातील पाझरलेल्या पाण्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान







चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)-

अधिवेशन सोडून सोनगाव-शिवणी प्रकल्पावर आलेल्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता लांडेकर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची काजू-बादाम पार्टी आज सोनगाव-शिवणी प्रकल्पातील बाधित संतप्त शेतकऱ्यांनी उधळून लावली.
सोनगाव-शिवणी प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट झाल्याच्या अनेक तक्रारी जलसंपदा विभागाला झाल्या आहेत. यापूर्वीही अनेक तक्रारी स्थानिकांनी केल्या असतांनाही जलसंपदा विभागाने याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तलाव पूर्ण भरला असूनही तलावातील पाणी सोडली नसल्याने स्थानिक अनेक शेतकऱ्यांची शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 2016 चे खरीप, आणि रब्बी पीकांची शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतांनाही अजूनही संबंधित विभागाकडून याची साधी पाहणी हि करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा विवंचनेत सापडला आहे. मात्र आज संबंधित विभागाचे मुख्य अभियंता लांडेकर, अधीक्षक अभियंता ढवळे, कार्यकारी लाडोळे, कनिष्ठ अभियंता श्रीराव सोनगाव-शिवणी प्रकल्पावर आले असता प्रशांत कांबळे आणि संबंधित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी गेले असता चक्क अधिकाऱ्यांची काजू-बादाम पार्टी सुरु असल्याचे आढळून आले. मात्र यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेतीच्या मोबदल्याचे विचारले असता तात्काळ काजू-बादाम च्या प्लेटा टेबलावरून उचलून नेने सुरु करण्यात आले. अशातच अधिकारी सोनगाव-शिवणी प्रकल्पावरून पळ काढला.
स्थानिक अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असतांना अद्यापही कोणतेही नुकसान भरपाई न दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता अधीक्षक अभियंता यांनी 31 डिसेंबर पर्यंत नुकसान भरपाई देण्याचे यावेळी आश्वासन दिले असून भरपाई न मिळाल्यास प्रकल्पातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी पासून गाव बंदी करणार असल्याचे इशारा दिलाय. यावेळी राजेश डहाके, मनोहर वाघ, विलास आसोले, प्रशांत शिरभाते, सुनील मेश्राम, अतुल शेळके, दिनेश आमले, दीपक चनवटकर, सुधीर मेटे, प्रशांत वासणिक, उमेश मडावी, चेतन म्हात्रे, संजय मेटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.