BREAKING NEWS

Saturday, December 17, 2016

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकिय सेवेत समावेशन (नियमित) करण्याच्या प्रक्रियेला वेग


समावेशनाकरीता शासनाकडुन समिती गठित
आ. बच्चु कडु यांच्या नेतृत्वाला  यश



शहेजाद खान / चांदूर रेल्वे /---



राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेले सर्व कंत्राटी  अधिकारी व कर्मचारी गेल्या 2005 पासुन आरेाग्य सेवे पदावर महाराष्ट  राज्यात विवीध पदावर कंत्राटी  कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाृयांची नियुक्ती शासनाने विहीत केलेल्या मा.जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अभियानाच्या यशस्वितेसाठी या कंत्राटी  कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. अभियांनातील कार्यरत कर्मचायामुळे आरोग्यसेवेचा दर्जा निश्चितच उंचावलेला आहे. त्याचे उदाहरण म्हणजे राज्यात संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढले असुन आय.एम.आर. व एम.एम. आर चा दर कमी झाालेला आहे भारतात राज्याचा क्रमांक तिसरा आहे. तसेच सन 2011-12 मध्ये महाराष्ट  असे एकमेव राज्य आहे ज्याने आय.एम.आर. दर 5 ने कमी केला आह तसेच अनेक प्रकारचे उद्यीष्ट व पुरस्कार महाराष्ट राज्यात राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियानामुळे आरोग्य विभागाला परीनामी महाराष्ट राज्याला मिळालेले आहे. असे सर्व्हेक्षणातुन सिध्द झाालेले आहे. असे असुनही आज त्यांचावर उपासमारीची टांगती तलवार असलेली दिसत आहे.

या सर्व बाबींचा विचार करफन या कर्मचाऱ्यांचे लढा देण्यात दिनांक 24-08-2016 सुरफवात केली. 24-08-2016 पासुन 31-08-2016 पर्यंत काळया फीती लावुन काम करणे, त्यामध्ये 29-08-2016  ते 31-08-2016  या काळामध्ये मा. आमदार व खासदार यांच्या भेटी घेवुन त्यांना निवेदन सादर करणे याच दरम्यान मा.आमदार बच्चु कडु यांच्या नेतत्रत्वात दिनांक 28-08-2016 ला अमरावती येथे राज्य स्तरीय भव्य मेळावा आयोजित करण्यात आला व त्यानंतर आमदार बच्चु कडु यांच्या नेतत्रत्वात दिनांक 09-02-2016 रोजी मोर्चे काढण्यात आले. एवढे करूनही शासनाला जाग न आल्यामुळे दिनांक 26-10-2016 ला आझााद मैदान मुंबई येथे दहा ते बारा हजार कर्मचाऱ्यांचे उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला त्यावेळी सरकारला जाग आली व त्यावेळी मा. आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी बैठक बोलावुन समिती तयार करून  समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आश्वासनाची पुर्तता न केल्यामुळे दिनांक 15-12-2016 ला आमदार बच्चु कडु यांच्या नेतत्रत्वात हिवाळी अधिवेशनावर 15000 ते 20000 कर्मचाऱ्यांनी  मोर्चा काढला व जो पर्यंत निर्णय
होत नाही तो पर्यंत उठायचे नाही असे ठरविल्यामुळे मा. आरोग्य मंत्र्यांनी  बैठकिला
बोलावुन राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेले सर्व कंत्राटी
अधिकारी व कर्मचारी यांना शासन सेवेत कश्या प्रकारे समायोजन करता येईल या
करीता समिती गठीत केली. समिती मध्ये आरोग्य विभाग,ग्राम विकास विभाग, वित्त
विभागाचे अधिकारी व संचालक आरोग्य सेवा व संघटनेचे दोन प्रतिनिधी अशा प्रकारे
समिती गठित करण्यात आली. व या समितीने तीन महीण्यात अहवाल सादर करावाअसे
सांगण्यात आले. व या कालावधीत जर पद भरती झााली करण्यात आली तर
त्या भरती मध्ये 30 %  गुण देण्यात येईल असे ठरविण्यात आले. व अशा पद
भरतीची जाहीरात आली असल्यास त्याला तात्पुरती स्थगीती देण्यात येणार असल्याचे
मा. आरोग्य मंत्र्यांनी सांगीतले. यावेळी आ. बच्चु कडू यांनी आरोग्य मंत्री  तसेच मोर्चाला
सांगीतले कि जर यावेळी आश्वासन पुर्ती नाही केली तर पुढिल आंदोलन मंत्र्यांचा
घरी जावुन करू  असा प्रहार केला. या बैठकिला मा.श्री दिपकजी सावंत, आरोग्य मंत्री  महाराष्ट राज्य, मा.श्री
श्रीकांत सिंग, आरोग्य सचिव, मा. आमदार बच्चु भाउ   कडु, संघटनेचे अध्यक्ष
नंदकिशोर कासार,राज्य सचिव विजय सोनोने, राज्य उपाध्यक्ष प्रशांत जोशी, जि.प कर्मचारी
संघटेनेचे अध्यक्ष अरफनजी खरमाटे, उपस्थित होते. मोर्चा करीता संघटनेचे
राज्याचे कार्याध्यक्ष शंकर तावडे, कोषाध्यक्ष किरण शिंदे, तसेच विकार धुमाळ हर्शल
रनवरे, राकेश नाकाडे, विजय वडडेवार, इत्यादी सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित
राज्यातुन हजारोंच्या संख्येने उपस्थित होते

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.