चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--
अमरावती येथुन धामणगाव कडे जाणारी एसटी बस (एमएच-४०/८४४२)गुरूवारी (ता.१५) भर दुपारी चार वाजता चांदूर रेल्वे शहरातील विरूळ रस्त्यावर बंद पडली. जवळपास तीन तास प्रतिक्षे नंतरही तरी दुसरी एसटी बस न आल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
‘ प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ हे ब्रिद घेऊन धावणारी एसटी बस आता भंगार झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या एसटी बसेस कुठेही बंद पडुन प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशीच घटना गुरूवारी दुपारी चार वाजता चांदूर रेल्वे येथे इंदिरा नगरात विरूळ मार्गावर जवळ घडली. अमरावती ते धामणगाव रेल्वे जाणारी एसटी बस (एमएच-४०/८४४२) दुपारी २ वाजताची एसटी बस तब्बल एक तास उशीराने सुटली. चांदूर रेल्वे बस स्टेशनवर ४ वाजता पोहचली. त्या एसटी बसने स्टेशन सोडले आणि विरूळ मार्गाने धामणगाव रेल्वे कडे जातांना शहरातील इंदिरानगर जवळ अचानक बंद पडली. तेव्हा चालकांने चांदूर रेल्वे डेपोला फोन करून एसटी बस स्टार्ट होत नसल्याचे सांगीतले व दुसरी बसची व्यवस्था करण्याची विनंती केली. परंतु तब्बल तीन तास उलटले तरी एसटी बस आली नाही ना चांदूर रेल्वे डेपोचा कोणी मेकेंनिक. त्यामुळे शेवटी कंटाळून चालकांने चांदूर रेल्वे बस डेपो गाठले. या सर्व अडचनीने व अमरावती आगाराच्या भंगार एसटी बसमुळे मात्र प्रवाशांना तीन तास ताटकळत बसावे लागले.

Post a Comment