BREAKING NEWS

Saturday, December 17, 2016

सोनगाव येथील पूर्व माध्यमिक शाळेची व्यवस्थापन समिती गठीत - समिती सभापती पदी सौ.अंजली विनोदराव ठाकरे यांची नियुक्ती - उपसभापती पदी घनश्याम मरगडे

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )



तालुक्यातील सोनगाव येथील पूर्व माध्यमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली. यामध्ये मुख्याध्यापिका कदम मैडम, गावातील निवृत्त शिक्षक अण्णाजी मेटे, राजेश डहाके, गजानन आमले, यांच्यासह गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंजली विनोद ठाकरे यांची समिती सभापती तर उपसभापदी म्हणून घनश्याम मरगडे यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या शाळांमध्ये व्यवस्थापन सांभाळण्यासाठी गावपातळीवरील व्यवस्थापन समितीची स्थापना दर 2 वर्षा नंतर स्थापन केल्या जात असते. त्यामुळे तत्कालीन समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर याची रीतसर बैठक शाळेत आयोजित करून समिती स्थापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कदम मैडम यांनी समिती स्थापनेचा प्रस्ताव मांडला. यामध्ये 7 सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये
राजेश कोल्हे, रवींद्र वगारे, सुनीता रंधळे, राजेश कांबळे, सुनील इंगोले, यांची शाळा व्यवस्थापन समिती समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याद्यापिका आणि पालकांकडून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आता ही समिती 2 वर्षासाठी कार्यरत राहून शाळा व्यवस्थापन सांभाळणार आहे. यावेळी प्रामुख्याने प्रशांत कांबळे, नारायण कडू, गजानन मरगडे, राजू चनवटकर, रंजित गोंढाणें, दिनेश आमले, दिलीप रंधळे, यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.