जबलपूर (मध्यप्रदेश) येथे ‘एक भारत
अभियान - कश्मीर की ओर’च्या अंतर्गत सभा !
![]() |
हिंदु धर्मजागृती सभेत सनातनचा ‘मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन
|
जबलपूर- काश्मीर बळकावू पहाणार्या फुटीरतावाद्यांचे सरकार आज ऐकत असेल, तर आमचेही म्हणणे शासनाने ऐकावे; कारण काश्मीर आमची भूमी आहे. आम्हाला तेथे विनाअट केंद्रशासनाचे नियंत्रण असलेला स्वतंत्र भूभाग हवा. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अन्यायाविषयी पुष्कळ थोड्या लोकांना माहिती होते; पण आज हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देशभरातील हिंदूंमध्ये याविषयी जागृती झाली आहे. काश्मिरी पंडितांवरील (काश्मिरी हिंदूंवरील) अन्यायाच्या विरोधात देशभरातील हिंदूंचा हा पुढाकार भारावून टाकणारा आहे, असे प्रतिपादन ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे अध्यक्ष राहूल कौल यांनी केले. ते येथील ‘हॉटेल समदाडिया इन’च्या सभागृहात २० नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडलेल्या ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’च्या अंतर्गत हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित २०० युवकांना मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, हिंदू सेवा परिषद (जबलपूर)चे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी, शहराध्यक्ष श्री. निखिल कनौजिया आणि सनातन संस्थेचे श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते.

Post a Comment