BREAKING NEWS

Monday, November 28, 2016

जळगाव जामोद पालिकेवर भाजपची पुन्हा सत्ता नगर अध्यक्षा सह १० उमेदवार विजयी .काँग्रेस ६, सेना २ व भारिप १ जागेवर विजयी

  जळगांव जामोद :- राहुल निर्मळ /-




               नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०१६ चे निकाल दि २८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले या मध्ये जळगाव जामोद नगर पालिकेवर भाजपने पुन्हा आपली सत्ता कायम ठेवली असून भाजपच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ . सीमाताई कैलास डोबे यांनी ७७७९ मते मिळवीत विजय संपादित केला तर काँग्रेसच्या लताताई तायडे यांना ६०७७ मते मिळवली . भाजप कडून पार्वताबाई कोथळकर,रत्नप्रभा खिरोडकर ,माजी नगर अध्यक्ष नलूताई भाकरे ,सविता कपले,मांगीलाल भंसाली , सविता खवणे ,उषाताई धदर , व शैलेंद्र बोराळे ,जयमाला इंगळे हे उमेदवार विजयी झाले असून माझी नगर अध्यक्ष रामदास बोंबटकर यांचा पराभव शिवसेनेचे माजी नगर अध्यक्ष गजानन वाघ यांनी केला .तर काँग्रेस कडून श्रीकृष्ण केदार ,अर्जुन घोलप ,नितीन ढगे,सौ .कुतीताई  पाटील ,सौ. चित्राताई इंगळे ,कलीम खा हुसेन खा ,हे सहा उमेदवार विजयी झाले तर शिवसेनेचे गजानन वाघ ,रमेश ताडे हे दोन उमेदवार विजयी झाले तर भारिप बसम कडून संजय पारवे हे विजयी झाले .एकंदर झालेल्या निवडणुकीच्या विचार करता भारतीय जनता पक्षाने मागील सत्ता काळात शहरात केलेल्या विकास कामाच्या भरवश्यावर जनतेने त्यांना विजयी केले असून सदर निवडणूक आ .संजय कुठे यांच्या साठी प्रतिष्ठेची बनली होती झालेल्या विजया वरून आमदारांनी प्रतिष्ठा कायम राहिली असून शिसेनेने माजी न प. उपाध्यक्ष सुद्धा आपली विजयाची परंपरा कायम ठेवण्यात अपयशी राहिले यावेळी बऱ्याच नवीन चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिली आहे .      .   

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.