BREAKING NEWS

Tuesday, August 16, 2016

*अमरावती शिक्षणाीकारी यांचे अडेलतट्टू निर्णयाने नऊ शिक्षकांची व कर्मचा-यांवर उपासमारीचे दिवस* - * जी.के.खापरे विद्यालय थुगाव येथील घटना * कर्मचा-यांनी केली गृहराज्यमंत्र्याकडे तक्रार * ना.रणजीत पाटील यांनी दिले आश्वासन

प्रमोद नैकेले /---
*अचलपूर*:-ऐकावे ते नवल गुरूर ब्रम्हा गुरूर विष्णू गुरूर देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रम्ह असे म्हणून शिक्षकांचा सन्मान करणा-या या सीस्टीम मध्ये चक्क एप्रिल 2016 पासून काहीही कारण नसतांना नजीकच्या जी.के.खापरे विद्यालय थुगाव चांदूरबाजार येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गावर वेतनापासून वंचित ठेवले आहे.
   सविस्तर वृत्त असे की,जी.के.खापरे विद्यालय थुगाव चांदूर बाजार येथील मुख्याध्यापक एन.टी.अर्डक 31 मार्च 2016 रोजी सेवानीवृत्त झाले.संस्था सचिवांनी शाळेतील सेवाजेष्ठ शिक्षक एस.बी.पाटील यांना प्रभारी मुख्याध्यापक म्हणुन नियुक्ति चे आदेश दिले त्यानुसार पाटील यांचा शिक्षणाधीकारी(माध्य.)अमरावती यांचे कडे
आर्थिक व प्रशासकीय अधिकारी प्राप्तीसाठी प्रस्ताव सादर केला व नियमीत कामकाज सुरू केले मात्र शिक्षणाधिकारी यांनी शाळेतील ज्या शिक्षकाचे काम असमाधानकारक असून यापूर्वी ज्यांचेवर कायदेशीर कार्यवाही झालेली असून त्यांच्या मुळे प्रशासकाची नियुक्ति करण्यात आली होती तसेच त्यांचे वर न्यायालयातून सुध्दा व्यवस्थापक मंडळाला कारवाई चे आदेश दिले होते.अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गासोबत न जमणा-या शिक्षकाला नियमबाह्य आर्थिक व प्रशासकीय अधिकार दिले. त्या प्रभारी मुख्याध्यापकांनी त्यांचे विश्वासातील कारकुन व स्वताचे वेतन काढणे सुरू ठेवून इतर नऊ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन बंद केले.या बाबत सर्व कर्मचारी वर्गाने शिक्षणाधिकारी यांचे कडे लेखी तक्रार सुध्दा केली पण अजूनपर्यंत कोणतीच कार्यवाही केली नाही त्यामुळे या मान्यताप्राप्त कर्मचा-यावर ऊपासमारीची वेळ आली आहे आजपर्यंत पाच महिने होवून सुध्दा शिक्षणाधिकारी यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही.यावरून काही तरी पाणि मुरल्याचा आरोप सुध्दा कर्मचारी वर्गाने केला आहे.
न्याय मिळण्यासाठी एस.बी.पाटील यांचे सह एस.व्ही.काटे,आर.व्ही.आवारे,आर.के.वाटाणे,एस.पी.कडू,एल.एस.संभे,एस.जी.ठाकरे,एच.एम.धोंडे व आर.जी.धुर्वे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांना निवेदन देवून केली.नामदार रणजीत पाटील यांनी समस्या एकुण शिक्षणाधिकारी यांना याबाबत विचारणा करून त्वरित न्याय मिळवून देण्याचे आश्वासन कर्मचा-यांना दिले.अन्यायग्रस्त कर्मचा-यांनी आमचे प्रतिनिधी सोबत बोलतांना असेही म्हटले की जर न्याय मिळाला नाही तर आम्ही तिव्र आंदोलन करण्यात येईल हे कर्मचारी अचलपूर येथे राज्यमंत्र्यांचे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.