BREAKING NEWS

Sunday, November 20, 2016

ग्रामदैवत सिद्धेश्‍वराला श्रीफळ अर्पण करून आणि श्री रूपाभवानीदेवीची ओटी भरून सभेच्या प्रसारास शुभारंभ

सोलापूर येथे ४ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा 

ग्रामदैवत सिद्धेश्‍वराला हार आणि
श्रीफळ अर्पण करतांना कार्यकर्ते
     सोलापूर - येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ४ डिसेंबर २०१६ या दिवशी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या प्रसारासाठी देवतांचे आशीर्वाद मिळावेत; म्हणून समितीच्या वतीने नुकतेच येथील ग्रामदैवत सिद्धेश्‍वराला हार आणि श्रीफळ अर्पण करण्यात आले, तसेच श्री रूपाभवानीदेवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर सभेच्या प्रसारास उत्साहाने प्रारंभ केला. 
     या वेळी पद्मशाली समाजाचे सत्यनारायण गुर्रम, माजी नगरसेवक बापू ढगे, आजोबा गणपती ट्रस्टचे गंगाधर गवसने, शिवसेना विभागप्रमुख संजय साळुंखे, समितीचे कार्यकर्ते आणि रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.