BREAKING NEWS

Saturday, December 31, 2016

चांदुर रेल्वे च्या पत्रकारावर भ्याड हल्ला * कॉलिसगाडी व बाईक वरून आले हल्लेखोर *लोखंडी पाईप काचेच्या बॉटल्स व फायटर ने हल्ला


चांदुर रेल्वे:- शहेजाद खान /---




    चांदुर येथील सी सी एन न्युज चॅनल चे संचालक तथा अखीलभरातीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल विष्णूआप्पा गवळी वय 42 शनिवारी सकाळी कार्यालया मध्ये कामकाज करत असताना काही अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या 10 ते 12 लोकांनी अमोल गवळी यांच्यावर लोखंडी पाईप,काचेचे बॉटल,व फायटर  ने प्राणघातक हल्ला केला . सादर घटना पाहताच परिसरातील नागरिक वेळीच धावून आल्यामुळे ते यातून बचावले.
   सविस्तर वृत्त असे की चांदुर रेल्वे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे चांदुर रेल्वे तालुकाध्यक्ष तथा स्थानिक  सी सी एन न्युज चॅनल चे संचालक अमोल गवळी नेहमी प्रमाणे शनिवारी  (ता,31)सकाळी कार्यालयात बसले असतांना आशिष वानखडे,गाढवे यांच्या समवेत 10 ते 15 गुंड प्रवृतीच्या  लोकांनी कार्यालयात घुसून  त्यांच्या वर हल्ला चढविला,व त्यांना कार्यालयाच्या बाहेर ओढून फायटर ,लोखंडी पाईप काचेच्या बॉटल जोरदार मारहाण कराणे सुरु केले .त्याच वेळीं अंकुश खाडे व सागर गावंडे या दोघांवरही हल्ला चढविण्यात आला. हल्ले खोरांनी काचेची बॉटल ने अंकुश खाडे वर हल्ला केला,अंकुश ने हल्ले खोराचा वार हातावर झेलला, त्यामध्ये त्याचा तळ हात व मनगट गंभीर जखम झाली.तर सागर गावंडे ला लाथा भुक्क्यांनी मारणे सुरु केले, हल्ले खोरं हे कॉलिस गाडी (एमएच ३१/एएच०६३४)मधून व मोटार सायकल वर आले होते.अमोल गवळी यांना मारहाण होताना दिसताच  धावून आलेल्या नागरिकांनी हल्ले खोरांना परतावून लावले, नागरिकांची गर्दी वाढतच हल्ले खोरांनी आपला घटना स्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात अमोल गवळी यांच्या पाठीला, मानेला, व पायांना जबर दुखापत झाली, त्यांना परिसरातील लोकांनी लगेच ग्रामीण रुग्णालयात व त्या नंतर अमरावती येथील इर्विन रुग्णालयात भरती केले, सदर हल्ला हा पत्रकारांवरील भ्याड हल्ला असून याचा निषेध तालुक्यातील सर्व पत्रकारांनी केला व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी ,पालकमंत्री,जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामीण)यांच्या कडे जाऊन केली. यावेळी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्राचे शहर व जिल्हा प्रतिनिधी हि हजर होते. एकीकडे पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्त शासन दरबारी कडक कारवाईची मागणी सुरु असतांनाच काही समाजकंटकाचे भ्याड हल्ले सुरूच आहे. यावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास पत्रकार संघातर्फे तीव्र आंदोलन छेडल्या जाणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.