चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
घुईखेड हे बेंबळा प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेले गाव. मागील अनेक वर्षांपासून शासनाने या
गावाकडे दुर्लक्ष झाले आहे़. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त आपल्या नशिबाला दोष देत जगत असल्याचे पहायला मिळत आहे. पुनर्वसन झाल्यापासुन गावात टँकरनेच पाणी पुरवठा होत असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी १ वर्षांपुर्वी दिलेल़्या निर्देशानंतरही अद्याप गावात पाईपलाईनने सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांनीही केराची टोपली दाखविली असल्याचे दिसत आहे.
अमरावती जिल्हयातील बेंबळा प्रकल्पग्रस्त घुईखेडसह आठ गावांचे पुर्नवसन सन 2006 -2007 मध्ये झाले असले तरी मुलभूत सोयी
सुविधांचा अभाव असल्याचे दिसत आहे. पाणीपुरवठा योजना मंजूर केली नसल्याने आजही दूषित पाणी प्यावे लागत आहे़. तत्पूर्वी नवीन पाईप लाईन टाकली. परंतु तरीही काही कारणास्तव पाईपलाईन ऐवजी टँकरनेच पाणीपुरवठा होत आहे़. गावातील काही भागात कुठे दोन ते तीन दिवसांनी तर कुठे तब्बल आठ दिवसांनी पाण्याचा टँकर येत असल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच मागील वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यवतमाळ जिल्ह्यातील डेहणी प्रकल्पावर आले असता घुईखेड येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र ते निर्देश हवेतच विरल्याचे दिसते. या निर्देशाकडे चक्क बेबळा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले असुन अजुनही टँकरनेच पाणीपुरवठा केल्या जात आहे. पुनर्वसन झाल्यानंतर एवढ्या वर्षांत पाईपलाईन ने पाणीपुरवठा करणे गरजेचे होते. मात्र या उलट जि.प. अमरावतीचे ४ टँकर भाडेतत्वावर घेवुन व बेंबळा प्रकल्पाचे ३ टँकर अशा ७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर बेंबळाचे इतर ३ टँकर नादुरूस्त स्थितीत धुळखात असल्याचे समजते. पाण्यासह इतरही अनेक समस्यांनी पुनर्वसीत घुईखेड या गावाला ग्रासले आहे. बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे प्रकल्पग्रस्तांचे मरण हेच का शासनाचे धोरण असे म्हणण्याची वेळ घुईखेडवासीयांवर आली आहे. तरी गावातील पाणीपुरवठा पाईपलाईनने व्यवस्थितपणे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे..
घुईखेड गावात हिवाळ्यातही कुठे दोन ते तीन दिवसांनी तर कुठे तब्बल आठ दिवसांनी पाण्याचा टँकर येत असल्यामुळे गावकऱ्यांत चिड निर्माण होणे सहाजिकच आहे. मात्र गावकरी हा राग बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांऐवजी थेट टँकर ड्रायव्हरवरच काढतांनाचे चित्र अनेकवेळा पहावयास मिळते. त्यामुळे गावात टँकर ड्रायव्हर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असला तरी ते प्रामाणिकपणे अनेक वर्षांपासुन आपली ड्युटी बजावत आहे.

गावकऱ्यांचा राग अधिकाऱ्यांऐवजी टँकर ड्रायव्हरवरच !!

Post a Comment