BREAKING NEWS

Thursday, December 15, 2016

एम्आयएम् चे कमर खान यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट !

जाहीर सभेतून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण 

     ठाणे - जाहीर सभेत हिंदूंच्या विरोधात वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एम्.आय.एम्.चे (मजलिस-ए-इत्तेहादुल-उल-मुस्लिमीन) स्थानिक नेते कमर खान यांना ठाणे नगर पोलिसांनी चौकशीकरिता कह्यात घेतले आहे. मागील मासात खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एम्.आय.एम्.मध्ये प्रवेश केला. एम.आय.एम्.मध्ये प्रवेश करताच त्यांनी सभांतून हिंदु धर्माच्या विरोधात उघडपणे बोलायला प्रारंभ केला. मागील मासात अशाच एका सभेत हिंदु धर्माच्या विरोधात बोलल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने कमर खान यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी कमर खान यांना त्यांच्या मुंब्रा येथील घरातून चौकशीसाठी कह्यात घेतले; मात्र अद्याप त्यांना अटक केली नसल्याचे पोलीस उपायुक्त त्रिमुखे यांनी सांगितले

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.