BREAKING NEWS

Saturday, December 24, 2016

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यावर कारवाई नाही ! - सरकारचे उच्च न्यायालयात शपथपत्र



 मुंबई - नवरात्र, गणेशोत्सव आदी उत्सव ठराविक कालावधीकरिता असतात; मात्र मशिदींवरील भोंगे वर्षाचे १२ महिने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे प्रतिदिन उल्लंघन करतात, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही, अशी माहिती सरकारने मुंबई उच्च न्यायालयास सादर केलेल्या शपथपत्रात २३ डिसेंबरला दिली. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी होणार्‍या कार्यक्रमांच्या आवाजाची पातळी तपासण्यासाठी उपलब्ध डेसीबल मीटर्स वापरले जातील. आवाजाच्या पातळीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करू, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधातील संतोष पाचलग यांची याचिका आणि या संदर्भातील तीन अवमान याचिका यांची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. याप्रसंगी शासनाच्या वतीने त्यांच्या अधिवक्त्यांनी म्हणणे मांडले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.