BREAKING NEWS

Saturday, December 24, 2016

शहरात आज भव्य रक्तदान शिबीर रामदेवबाबा भक्त परीवाराचे आयोजन

चांदुर रेल्वे- (शहेजाद  खान)




मानवाची निर्मिति ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसऱ्या गरजु मानवाला चालते. आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे.
मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. त्यामुळे आज शनिवारी शहरातील रामदेवबाबाबा भक्त परीवारातर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
      सदर रक्तदान शिबीराचे आयोजन स्थानिक धनराज नगरातील भारूका मातृसेवा मंदिर येथे सकाळी ८ ते १२ वाजता पर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे या रक्तदान शिबीरात रक्तदान करून सहकार्य करण्याचे आवाहन रामदेवबाबा भक्त परीवार, चांदुर रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.