BREAKING NEWS

Monday, December 5, 2016

देशात कायद्याचा आधार घेत हिंदु धर्मावर आघात केले जात आहेत ! ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ, सोलापूर

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला ३ सहस्र ८०० हिंदूंची उपस्थिती 

ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

उपस्थित जनसमुदाय 
     सोलापूर- कीर्तने, प्रवचने यांना कायद्याचा धाक दाखवला जातो; मात्र पहाटे ५ वाजताच्या अजानाकडे दुर्लक्ष केले जाते. या देशात कायद्याचा आधार घेत हिंदु धर्मावर आघात केले जात आहेत. मी एकट्याने काय करावे, असा विचार जर छत्रपती शिवरायांनी केला असता, तर आज आपल्याला गुडघ्यावर बसून दर्शन घ्यावे लागले असते. छत्रपती शिवरायांच्या कृपेनेच आज आम्ही कीर्तन, प्रवचन करू शकत आहोत. त्यासाठी आपल्यासमोर छत्रपती शिवरायांचाच आदर्श असायला हवा, असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी व्यक्त केले. येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानात ४ डिसेंबरला आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे साधक श्री. दैवेश रेडकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हा संघटक सौ. अलका व्हनमारे उपस्थित होत्या. 

     ह.भ.प. इंगळे महाराज पुढे म्हणाले, "या देशात धर्माविषयी जागृती करावी लागते, देशाचा अभिमान बाळगा, हे सांगावे लागते, हे दुर्दैवी आहे. या देशात मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जात आहे. कुटुंबप्रमुखच आपले कर्तव्य विसरत असेल, तर अशा सभांची आवश्यकता आहे. पंढरपूर येथे लक्षावधी भाविक वारीला येतात; परंतु या ठिकाणी पुरेशी शौचालयेसुद्धा नाहीत. यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत."

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.