BREAKING NEWS

Friday, January 6, 2017

परभणीत बाळासाहेब ठाकरे स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा होणार - राजे संभाजीतर्फे 14 ते 22 जानेवारीदरम्यान आयोजन

परभणी  / मोईन खान /--

संग्रहित फोटो 



शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने 14 ते 22 जानेवारी दरम्यान मराठवाडास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेते संघ व खेळाडूंना रोख दीड लाखाची पारितोषीके दिली जाणार आहेत.

राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील या स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 71 हजार रूपये व उपविजेत्या  संघाला रोख 51 हजार रूपयांचे पारितोषीक व करंडक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या मालिकाविरास रोख 11 हजार रूपये, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व यष्टीरक्षकास प्रत्येकी 5 हजार रूपये तर प्रत्येक सामन्याच्या सामनाविरास रोख अकराशे रूपये व करंडक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मराठवाड्यातील 6 संघांना निमंत्रीत केले जाणार आहे. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने केली जाणार आहे. प्रत्येक सामना 20 षटकांचा व पांढर्‍या चेंडूने खेळविण्यात येणार आहे. तर खेळाडूंचा गणवेश रंगीत राहणार आहे. चेंडू व गणवेश संयोजकातर्फे दिला जाणार आहे. या स्पर्धेत मराठवाड्याच्या बाहेरील खेळाडूंना बंदी राहील. महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेच्या दर्जाच्या पंचांना स्पर्धेसाठी निमंत्रीत केले जाणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलात या स्पर्धा होणार असून अधिक माहितीसाठी अभिजीत मुंढे, आशिष सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष खा. संजय जाधव यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.