चांदुर रेल्वे- - (शहेजाद खान)-
भरल्यागत माणसे कोंबलेली असतात. मात्र याकडे ना कोण्या वाहतूक शाखेच्या पोलिसांचे लक्ष जाते ना हद्दीतील ठाण्यांचे. व्यवस्थेचे अंकुश नसल्याने शहरभरात अवैध प्रवासी वाहतूकदारांचा हैदोस सुरु असल्याचे नुकतेच केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे.
असूनही हे पोलिस नेमके काय काम करतात
करतात, याविषयी लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा
आहे. नेमणूक एकीकडे तर काम दुसरीकडे केले जात असल्याने अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कुणाचाच धाक राहिला नाही. त्यामुळे एक- एक वाहनधारक दिवसभरात चार-चार, पाच-पाच खेपा करतात. यावरून चांदुर रेल्वे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
चांदुर रेल्वे शहरातुन अमरावती, कुऱ्हा, मालखेड, धामणगाव, देवगाव येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतुक केली जाते. अवैध प्रवासी वाहतूक करत असताना
वाहनधारक पैसा मिळविण्याच्या हेतूने आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी त्याचप्रमाणे
वाहनाला लटकवत भरत असतो. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना सुरक्षा मिळेल का नाही? या प्रश्नांचे वाहनधारकांसह व पोलिसांना देणे घेणे
नाही की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अतिरिक्त प्रवासी संख्येमुळे वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध प्रवाशी वाहतूक करणारे वाहनधारक
एस.टी.बस येण्याच्या कांही मिनिटांपूर्वीच आपली वाहने प्रवाशांनी खचाखच भरुन आपआपल्या दिशेने थाटात रवाना होतात. यामुळे एस.टी. प्रशासनाला चुना तर लागतोच शिवाय नागरिकांनाही आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूकीस वेळीच आळा घालून त्यांच्या व वाहनधारकात सुरु असलेले मित्रत्वांच्या संबंधांना अबाधित न ठेवता त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करून शासनाचा फायदा करून द्यावा एवढीच अपेक्षा.

Post a Comment