BREAKING NEWS

Sunday, January 15, 2017

*श्री संत यशवंत महाराज संस्था मुसळखेडा येथील पालखी यात्रेच्या रस्त्याला प्रशासकीय मंजुरात*


● *राज्य पर्यटन विभागाकडून बांधकामासाठी २९४ लक्ष रुपयाची तरतूद*
● *आ. डॉ. अनिल बोंडे यांच्या पाठपुराव्याला यश.*
वरुड :-



येथून जवळच असलेल्या मुसळखेडा येथील श्री. संत यशवंत महाराज हे वरुड परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री. संत यशवंत महाराज यांच्या समाधी स्थळाला नागपूर – वरुड मार्गे चांदस ते वाढोडा वरून मंदिराकडे रस्ता जातो. या रस्त्यावरून श्री. संत यशवंत महाराजाच्या दर्शनाकरिता शेकडो भाविक भक्त पालखी यात्रा घेऊन येत असतात, राजुरा बाजार वरून निघणारी पालखी यात्रा यामध्ये विशेषताने असते. चांदस ते मुसळखेडा मार्गे वाढोडा हा संपूर्ण पालखी यात्रा मार्ग तयार करण्याचे अभिवचन मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी जनतेला दिले होते. आमदाराच्या पाठपुराव्यामुळे दि. ४ जानेवारी २०१७ रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जिल्हा स्तरीय कामांना निधी वितरण करण्याचा आदेश निर्गमित केला आहे. त्यामध्ये श्री. संत यशवंत महाराज संस्था मुसळखेडा येथे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांना २९४ लक्ष रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून ५० लक्ष रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करण्यात आले आहे.*
            *या मंजूर कामामध्ये अस्तित्वात असलेल्या डांबरी रोडच्या सुधारणे करिता ३९.९० लक्ष चांदस ते मुसळखेडा (एमडीआर) ४८ या किलो मीटरच्या रस्त्याकरीता ११५ लक्ष रुपये तर मुसळखेडा ते वाढोडा या व्हीआर ११२ रस्त्याकरीता १३८ लक्ष रुपयांचा रस्ता निधी मंजूर करण्यात आलेला आहे. वरील प्राप्त झालेल्या निधीमुळे श्री. संत यशवंत महाराज समाधीच्या दर्शनाकरिता येणाऱ्या शेकडो भाविकभक्तांची यापुढे चांगली सुविधा निर्माण होणार आहे. आ.डॉ. अनिल बोंडे या निधीबाबत राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेन्द्रजी फडणवीस तथा पर्यटन मंत्री मा.ना.श्री. जयप्रकाशजी रावत, राज्यमंत्री मा.ना.श्री. मदनजी येरावार यांचे आभार मानले आहे. त्यासोबतच मतदार संघातील नागरिक व भाविकभक्तांनी आ.डॉ. अनिल बोंडे यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.*
  *पालखी यात्रा मार्गाच्या मंजुरीमुळे श्री. संत यशवंत महाराजाच्या भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातारवण निर्माण झाले आहे.*

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.