तिच जागा आणि तेच मित्र... काही वर्षांपूर्वी कट्ट्यावर बसून मारलेल्या गप्पा... केलेल्या गमती-जमती, मस्ती आणि धमाल या जुन्या आठवणी... तर खूप दिवसांनी झालेल्या गाठी-भेटीमुळे भरून आलेले मन... आणि नवीन गप्पा... नौकरीतील अनुभव या सगळ्यांनी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरींग कॉलेज च्या माजी विद्यार्थी मेळावा रंगला.
याची सुरुवात शेगाविचा राणा गजानन महाराज व शिक्षणाची आराध्य दैवत माता सरस्वती यांच्या पूजनाने व आरतीने केली जाते त्या नंतर संत गजानन महाराज संस्थेचे विश्वस्त श्री शिवशंकर भाऊ पाटील हे आपल्या शब्दात म्हणाले की आपण लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचे रूपांतर आज वट वृक्षात झालेले आहे ही कृपा गजानन महाराजी आहे असे म्हणून संबोधले नंतर कॉलेजची माहिती दिली जाते की कॉलेज ची आज कितपद प्रगतशील आहे व याला जगाच्या पाठीवर कसे यश मिळवता येईल व प्रगती केल्या जाईल या साठी आपले मार्गदर्शना आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत पांडे सरांनी शेरो शायरीने कार्यक्रमाला शोभा आणली व नंतर सर्वाना बोलण्यासाठी खुला मंच उपलब्द केला यावेळी सर्व विद्यर्थ्यांनी आपले कार्याविषयी माहिती दिली.
त्यानंतर कु.ऋषिका काशेलानी,कु राधिका देशमुख कु.कशीष पंजावणी या तीनी मुलीचा सत्कार करण्यात आला कारण त्यांनी विदेशात जाऊन विविध पदके पटकवली यावेळी मंचावर ए.बी. पी न्यूजचे उप चेअरमन श्री उदय संपत, आय.बी.यन चेअरमन उमेश कॉल, प्राचार्य सोमाणी सर, आशुतोष देऊसर, मिलींद पांडेसर उपस्थित होते होते.

Post a Comment