मुंबई –
पुण्यात २ जून २०१४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फेसबुकवरून झालेल्या अवमानामुळे उसळलेल्या दंगलीत रियाझ शेख याची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींना प्रत्यक्ष साक्षीदारांनी पहिल्याचा दावा असलेले आरोपी विजय गंभिरे, रणजीत यादव आणि अजय लालगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांच्यासह २५ सदस्यांना अटक केली होती; त्यातील १७ जणांवर शेख याच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यापैकी वरील तिघांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र तो फेटाळून लावण्यात आला होता. त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली असता न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी आरोपींचे शेख याच्याशी वैयक्तिक वैर नव्हते, ,असे म्हटले आहे.

Post a Comment