BREAKING NEWS

Monday, February 13, 2017

सात उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघार - २० उमेदवार निवडणूक रिंगणात


चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला, पळसखेड व घुईखेड जि.प.सर्कल 

चांदूर रेल्वे / शहेजाद खान  - 




आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर, पळसखेड व घुईखेड जिल्हा परिषद सर्कल  मधून सात उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
७ फेब्रुवारीला झालेल्या छाननीत चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर, पळसखेड व घुईखेड जिल्हा परिषद सर्वâल मधील २७ उमेदवारांचे ३० नामनिर्र्देशन पत्रे वैध ठरले होते. तर १३ फेब्रुवारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर (अनुसूचित जाती स्त्री )जि.प.सर्कलमधून संगीता चंदू उके (भारीप-बमसं), पुष्पा देवराव भटकर (अपक्ष) व विजया बाबाराव पाटील(पीपल्स रिपब्लीकन पार्टी) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामूळे आमला विश्वेश्वर जिल्हा परिषद सर्कलमध्ये अ‍ॅड.सुनिता प्रभाकर भगत (जनता दल सेक्युलर), आशा सुरेंद्र भोगे (शिवसेना), विजया राजेश पखाले (भाजप), मायावती अशोक भावे (राष्ट्रवादी काँग्रेस), संघमित्रा आनंद भगत (बहुजन समाज पार्टी), रंजना हरिभाऊ गवई(काँग्रेस) असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. पळसखेड (अनुसूचित जाती) जि.प.सर्कलमधून अ‍ॅड.सुनित ज्ञानेश्वर घोडेस्वार (भाजप) व मंदा अभिमान गवई (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामूळे पंजाब झाबाजी राऊत (भाजप), नितीन उमाकांत गोंडाणे (काँग्रेस), प्रशांत ओंकार पाटील (भारिप-बमसं), धनराज किसन शेंडे (राष्ट्रवादी काँगे्रस), चंद्रकांत मारोतराव खडसे (युवा स्वाभिमान पक्ष), देवराव नथ्थुजी करूणाधन (अपक्ष), पुष्पा मधुकर तायडे(शिवसेना) असे सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.घुईखेड (सर्वसाधारण महिला) जि.प.सर्वâलमधून समता संतोष घाटोळे (भारिप-बमसं) व माधुरी मोहन ठाकरे(भाजप) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामूळे आता निवडणूक रिंंगणात सरीता गजानन शहाडे (जनता दल सेक्युलर), रतिका विशाल देशमुख (शिवसेना), सिमा प्रशांत देशमुख (भाजप), राधीका प्रविण घुईखेडकर (काँग्रेस), मनिषा मुकुल परगणे (भारीप-बमसं), प्रेमा हरिभाऊ ठाकरे (अपक्ष) व संगीता देविदास वानखडे (भारतीय कम्युनिस्ट पार्टी) असे एकूण  सात उमेदवार रिंगणात आहे. आज सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. आता केवळ निवडणूक प्रचारासाठी सात दिवस उरले असुन कोण विजयी पताका लावणार हे येत्या २१ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.