BREAKING NEWS

Friday, February 3, 2017

मंगळवारी रोजगार मेळावा -जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात हा मेळावा

यवतमाळ- 

 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवारी, दि. 7 फेब्रुवारी रोजी मेळावा घेण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात हा मेळावा होईल.
रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावीरित्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा मेळावा घेण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यातील नामांकित खासगी कंपनीमधील नियोक्ते, कारखानदार यांच्या सोयीसाठी तसेच रोजगारास इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करून एकत्रित रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स को-लिमीटेडचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.
यासाठी 18 ते 37 वयोगटातील उमेदवारांनी सर्व कागदपत्र शैक्षणिक अर्हता, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे आदीसह स्वखर्चाने उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी 07232-244395 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.