BREAKING NEWS

Tuesday, February 14, 2017

अचलपूर शहरात संत शिरोमनी नरहरी महाराज पुण्यतिथी संपन्न

अचलपूर:- /प्रमोद नैकेले 
--


          देह जन्मला व्यर्थ झाले पापाचे पर्वत
                    दान धर्म नाही केला शेवटी जन्म वाया गेला
               देह अवघा क्षणभंगुर दिसे स्वप्नवत सारं


               नरहरी म्हणे शेवटी संगे न येई लंगोटी असा संदेश देऊन सपुंर्ण समाजबांधवांनाच नव्हे मानव जातीला आपल्या ख-या जन्माचा अर्थ पटवून नेणारे संत शिरोमनी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी अचलपुर परतवाडा जुळ्या शहरात संपन्न झाली.
              अचलपूर शहरात असलेल्या अभिनव काँलनी येथील श्री नरहरी सोनारसंघ अचलपूर व समस्त सुवर्णकार समाज यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे 13 फेब्रुवारी रोजी संत नरहरी महाराज यांच्या भव्य मंदिराच्या प्रांगणात पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने सपंन्न करण्यात आली.याप्रसंगी रांगोळी स्पर्धा,नरहरी महाराजांचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर बालकीर्तनकार सत्यपाल महाराजांचे शिष्य ऋषीपाल महाराज यांचे सुमधूर स्वरात किर्तन होवून समाजातील मान्यवरांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून सत्कारमुर्ती मुकुंदराव शहाणे,नागपूर व ओंकारराव म्हस्के,नागपूर यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच महाप्रसादानंतर लहान मुलीच्या नृत्याचा व महिलांच्या हळदीकुंकु च्या कार्यक्रमाने सांगता झाली कार्यक्रमाला सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.