१ व २ जुलै रोजी घोषीत शाळांच्या अनुदानासाठी आंदोलन
---------------------------------------------------
मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाचा श्रीगणेशा
----------------------------------------------------
🔸 शासनाने दिलेला शब्द पाळावा- श्री शेखर भोयर 🔸
शिक्षकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येउन १ व २ जुलै २०१६ रोजी अनुदानास पात्र असलेल्या शाळांना अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानीत शाळा कुती समीतीने मुंबई येथील आझाद मैदानावर उभारलेल्या धरणे आंदोलनास शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी भेट दिली.
विनाअनुदानीत शाळांना अनुदान मिळावे यासाठी गेली १६ वर्षापासुन ही लढाई सुरु झालेली आहे.या लढाईसाठी ५ डिसेंबर-८ डिसेंबर २०१६ दरम्यान सेवाग्राम ते नागपूर अधिवेशनापर्यंत हजारो विनाअनुदानीत शिक्षक व कार्यकर्त्यांसह पायदळ दिंडीचा श्रीगणेशाही केला होता. महाराष्ट्रातील हजारो विनाअनुदानीत शिक्षक न्यायासाठी १४ दिवस विधानभवनावर एकवटले होते.सरकारने त्यावेळेस केवळ आश्वासनच दिले होते.परंतु तरीही हिम्मत न हारता पुन्हा एकदा नव्या दमाने १ जुन २०१६ पासुन महाराष्ट्रातील हजारो विनाअनुदानीत शिक्षक न्यायासाठी राज्यातील उपसंचालक कार्यालयावर एकवटले होते.यानंतर ४ आॅक्टोबर २०१६ रोजी मंत्रीमंडळाच्या औरंगाबाद येथील बैठकीवर मोर्चाही काढण्यात आला होता.
१ व २ जुलै रोजी घोषीत झालेल्या व अनुदानास पात्र असलेल्या शाळांना अनुदान देण्यात यावे. औरंगाबाद येथे शिक्षकांवर आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे.उच्च माध्यमिक ८५० शाळांना अनुदानास पात्र म्हणुन घोषीत करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Post a Comment