BREAKING NEWS

Wednesday, March 15, 2017

मराठी रॅपर श्रेयश जाधव ची 'वीर मराठे' मधून शिवरायांना मानवंदना


'पुणे रॅप' च्या घवघवीत यशानंतर रॅपर श्रेयश जाधव पुन्हा एकदा एक नवेकोरे रॅपसॉंग प्रेक्षकांसमोर घेऊन येतो आहे. यावेळी त्याने शिवरायांवर आधारित 'वीर मराठे' हे हटके गाणे तयार केले आहे. १५ मार्च रोजी तिथीनुसार झालेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने या गाण्याचा पहिला टिजर पोस्टर रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आले.. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या स्तुतीपर गायेलेले हे पहिलेच रॅपसॉंग असून, या गाण्याद्वारे तो शिवरायांना मानवंदना देणार आहे.
एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध होणारे 'वीर मराठा' या रॅप गाण्याला हर्ष, करण आणि अदित्य यांनी ताल दिला असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन आणि कॉरियोग्राफी केली आहे या गाण्याचे बोल आणि रॅप स्वतः श्रेयश ने लिहिले आणि गायले आहे. प्रत्येक मराठी माणसाला स्फुरण देणारे 'वीर मराठे' हे रॅपसॉंग 'पुणे रॅप' इतकेच गाजेल यात शंका नाही.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.