![]() |
| केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या भेटीप्रसंगी निवेदन देताना वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी |
देशातील खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँकांनी तसेच काही प्रमाणात सरकारी बँकानी बचत खात्यातील तीन पेक्षा अधिक च्या रोखीच्या व्यवहारासाठी प्रस्तावित केलेले शुल्क हे अवाजवी असल्याचे मान्य करून हा निर्णय बदलण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिले.
वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज च्या वतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली येथे अर्थमंत्रालयात मेघवाल यांची भेट घेऊन यासंबंधीचे निवेदन दिले त्यावेळी ते बोलत होते. ललित गांधी यांनी बँकांनी बचत खात्यावर रोखीने चौथ्या व्यवहारापासून लावलेले 150/- रू. चे शुल्क हे जिझिया करापेक्षा अन्यायी असल्याचे सांगितले, तसेच देशात अद्याप डीजीटल पेमेंटची व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वित नसल्याने सामान्य माणसाला गरजेप्रमाणे रोख व्यवहार करावे लागतात व अगदी एक हजार रूपये इतकी रक्कम काढल्यास 150/- चे शुल्क हे आयकराच्या दरापेक्षा अधिक होत असल्याचे नमुद केले. अशा बेजबाबदार निर्णयामुळे लोक बँकेत पैसे न ठेवता घरीच रोख स्वरूपात ठेवतील अशी शक्यताही ललित गांधी यांनी व्यक्त केली. अर्थराज्यमंत्री मेघवाल यांनी ललित गांधी यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला व याप्रश्नी लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment