BREAKING NEWS

Tuesday, May 16, 2017

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण


महेन्द्र महाजन जैन /-
वाशिम - ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दि. १७ व १८ मे २०१७ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. १७ मे रोजी दुपारी ४.३० वाजता हिंगोली येथून हेलिकॉप्टरने मालेगाव तालुक्यातील शिरपूर खंडाळाकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता शिरपूर खंडाळा येथे आगमन व राखीव. सायंकाळी ५.१५ वाजता शिरपूर खंडाळा येथील ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण. सायंकाळी ६ वाजता शिरपूर खंडाळा येथून वाशिमकडे प्रयाण. सायंकाळी ६.३० वाजता वाशिम येथील एस. एम. सी. स्कूलमध्ये आयोजित संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ८ वाजता वाशिम येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

दि. १८ मे रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत राखीव. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना अंतर्गत बेलमंडल (ता. कारंजा), कुप्ता (ता. मानोरा), आसेगाव (ता. रिसोड) येथे मंजूर ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांचे भूमिपूजन निमित्त महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय प्रांगणात जनतेच्या तक्रारी स्वीकारून निवारणासाठी राखीव. यामध्ये महावितरण, महापारेषणसह राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. दुपारी १ ते २ राखीव. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात लोकप्रतिनिधींच्या समवेत बैठक. दुपारी ४.३० वाजता वाशिम येथून पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोलाकडे प्रयाण.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.