BREAKING NEWS

Wednesday, May 31, 2017

राष्ट्रसेवा दल अचलपूर तर्फे जागतिक महिला आरोग्य दिन संपन्न


अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-

28 मे हा दिवस 'मेन्स्ट्रल हायजिन डे' म्हणून साजरा करण्यात येतो यानिमीत्त स्थानीक माळवेशपुरा येथे अचलपूर राष्ट्रसेवा दल यांचे तर्फे जागतिक महिला आरोग्य दिन साजरा करण्यात आला.
     जागतिक महिला आरोग्य दिनानिमीत्त स्थानीक माळवेशपूरा येथे 24 मे रोजी कल्पना वाघमारे यांचे निवासस्थानी अचलपूर राष्ट्रसेवा दल यांचे सहाय्याने आयोजित कार्यक्रमात वर्षा पांडे प्रमुख अतिथी म्हणुन बोलतांना मासीक पाळीच्या काळात स्त्रियांनी आहाराची काळजी व शारिरीक स्वच्छता कशी राखावी याबद्दल मार्गदर्शन केले.ज्योती कोरडे,लताताई धोटे,सुहासीनी शेंगर,दलालताई,किरण निवाणे व सु्र्वणा वाडेकर यांनी स्वच्छता अभियान,स्त्रीपुरुष समानता,अंधश्रद्धा,वैज्ञानिक दृष्टीकोन याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला स्त्री मुक्ती गीताने प्रारंभ झाला दिपाली चवरे यांनी प्रास्ताविक,संचलन स्वाती घुटे तर आभार प्रदर्शन सुनंदा मडघे यांनी केले याप्रसंगी श्रुती चावरे यांनी आई स्वलीखीताचे अभिवाचन केले कार्यक्रमाला असंख्य महिला उपस्थीत होत्या.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.