BREAKING NEWS

Wednesday, May 31, 2017

बारावीच्या परीक्षेत चांदूर रेल्वे तालुक्याचा ८६.९६ टक्के निकाल ६४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, तर ७१५ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण


राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल, तर जि.प.विज्ञान महाविद्यालयाचा ९९ टक्के
निकाल

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, अमरावती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या
१२ वीच्या परीक्षेमध्ये चांदूर रेल्वे तालुक्याचा निकाल ८६.९६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या
निकालाच्या तुलनेत तालुक्याचा निकाल २.२९ टक्क्यांनी उंचावला आहे. तर २०१५ च्या निकालाच्या
तुलनेत ५.९५ टक्कांनी घसरला आहे. १०० टक्के निकाल लावत चांदूर रेल्वेच्या राजर्षी शाहू विज्ञान
महाविद्यालयाने तालुक्यातून अव्वल स्थान पटकविले. तर चांदूर रेल्वेच्या जि.प.कनिष्ठ विज्ञान
महाविद्यालयाने ९९ टक्के निकाल लावत तालुक्यातून व्दितीय स्थान पटकविले आहे.
बारावीच्या परीक्षेला चांदूर रेल्वे तालुक्यातून एकूण १ हजार ३२७ विद्यार्थी बसले.त्यापैकी १ हजार १५४
विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ६४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ७१५ प्रथम श्रेणीत तर ३४६ व्दितीय श्रेणीत
उत्तीर्ण झाले आहे. बारावीच्या परीक्षेत चांदूर रेल्वेच्या राजर्षी शाहू विज्ञान व अतुल जगताप कला कनिष्ठ
महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून ९३ विद्याथ्र्यांपैकी १ प्राविण्य श्रेणीत,
७७ प्रथम श्रेणीत व १५ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर कला शाखेचा ९२.६३ टक्के निकाल असुन
९५ पैकी ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.१६ प्राविण्य श्रेणीत, ५२ प्रथम व १७ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले
आहे. जिल्हा परिषद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल लागला असून १०० पैकी ९९
विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २ प्राविण्य श्रेणीत, ६१ प्रथम श्रेणीत, ३४ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
अशोक कला व वाणिज्य महाविद्यालय, चांदूर रेल्वेचा वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागला असुन
५९ विद्याथ्र्यांपैकी २ प्राविण्य श्रेणीत, २४ प्रथम व २७ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. बापुराव देशमुख
विज्ञान व कला महाविद्यालय, मांजरखेड कसबा चा विज्ञान शाखेचा ८७.३८ टक्के लागला असून १११
पैकी९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १४ प्राविण्य श्रेणीत, ६६ प्रथम व १६ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले
आहे. तर कला शाखेचा ७५ टक्के निकाल लागला असून ६८ पैकी ५२ उत्तीर्ण झाले असून ७ प्राविण्य
श्रेणीत ३३ प्रथम व ११ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. ज्युनिअर कॉलेज, पळसखेडचा कला शाखेचा
८० टक्के निकाल लागला. ४० पैकी ३२ उत्तीर्ण असून ३ प्राविण्य श्रेणीत, २४ प्रथम ,४ व्दितीय श्रेणीत
उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेचा ८९.७४ टक्के निकाल लागला.३९ पैकी ३५ उत्तीर्ण झाले असून ४
प्राविण्य श्रेणीत, २२ प्रथम व ९ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. तर एचएससी व्होकेशनला निकाल
७२.७२ टक्के निकाल लागला.४४ पैकी ३२ उत्तीर्ण झाले असून १७ प्रथम व १५ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण
झाले आहे.खंडेराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय,राजुरा यांचा कला शाखेचा ८३.९२ टक्के निकाल
लागला.११२ पैकी ९४ उत्तीर्ण झाले असून १ प्राविण्य, ५३ प्रथम व ३८ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
तर एचएससी व्होकेशनला निकाल ८३.३३ टक्के निकाल लागला. ५४ पैकी ४५ उत्तीर्ण झाले असून ३१
प्रथम व १३ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, मालखेड
रेल्वेच्या कला शाखेचा निकाल ८१.४८ टक्के निकाल लागला. २७ पैकी २२ उत्तीर्ण झाले असून २ प्राविण्य
श्रेणीत १६, प्रथम व ३ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. तर वाणिज्य शाखेचा निकाल ९४.५९ टक्के
निकाल लागला.३७ पैकी ३५ उत्तीर्ण झाले असून २ प्राविण्य श्रेणीत, २६ प्रथम व ७ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण
झाले आहे. आमला विश्वेश्वरच्या श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा ८९.८३ टक्के
निकाल लागला. ५९ पैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २९ प्रथम व २३ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले
आहे.तर एचएससी व्होकेशनला निकाल ७२.७२ टक्के निकाल लागला.४४ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
असून १७ प्रथम व १५ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. बापुसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय,
चांदूर रेल्वेचा निकाल ८७.०९ टक्के लागला.३१ पैकी२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ५ प्राविण्य
श्रेणीत,२१ प्रथम व १व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.बेंडोजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय, घुईखेडचा
कला शाखेचा निकाल ८७.०९ टक्के लागला.३१ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ५ प्राविण्य श्रेणीत,
२१ प्रथम व १ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. तर एचएससी व्होकेशनला निकाल ८४.८४ टक्के
निकाल लागला.६६ पैकी ५६विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २४ प्रथम व २८ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले
आहे.आमला विश्वेश्वरच्या इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयचा विज्ञान शाखेचा निकाल ८६.४८ टक्के
निकाल लागला.३७ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १ प्राविण्य श्रेणीत,३० प्रथम व १ व्दितीय श्रेणीत
उत्तीर्ण झाले आहे.कला शाखेचा निकाल ८०.९५ टक्के निकाल लागला.४२ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
असून १ प्राविण्य श्रेणीत,२७ प्रथम व ६ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.वाणिज्य शाखेचा निकाल ८२.६०
टक्के निकाल लागला.२३ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १ प्राविण्य श्रेणीत,१७ प्रथम व १ व्दितीय
श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

अनिकेत कळमकर
अनिकेत कळमकर विज्ञान शाखेतून,









प्रगती मोहन

प्रगती मोहन कला शाखेतू तालुक्यातून अव्वल 


बारावीच्या परीक्षेत चांदूर रेल्वे येथील जिल्हा परिषद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा अनिकेत कळमकर
याने ८९ टक्के गुण प्राप्त करून विज्ञान शाखेत तालुक्यातून अव्वल स्थान पटकविले आहे.तर बापुराव
देशमुख कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या सावी विनोद कर्हे  हिने ८५ टक्के गुण प्राप्त करीत व्दितीय
स्थान मिळविले आहे.तर राजर्षी शाहू विज्ञान व अतुल जगताप कनिष्ठ कला महाविद्यालय, चांदूर रेल्वेच्या
विज्ञान शाखेच्या अश्विन लोंधे याने ७३.२३ टक्के गुण मिळविले आहे.तर


 कला शाखेतून प्रगती मोहन
हिने ८२ टक्के गुण मिळवून तालुक्यातून अव्वल स्थान पटकविले आहे.


अश्विन लोंधे 


देशमुख कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या सावी विनोद कर्हे  हिने ८५ टक्के गुण प्राप्त करीत व्दितीय
स्थान मिळविले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.