BREAKING NEWS

Tuesday, May 16, 2017

कामगारांच्या तक्रार नोंदणी आणि किमान वेतनाच्या अंमलबजावणीकरिता वेबपोर्टल सुरु करणार - संभाजी पाटील-निलंगेकर

मुंबई - 


राज्यातील संघटित, असंघटित कामगारच्या तक्रार नोंदणी आणि किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत लवकरच एक ऑनलाईन वेबपोर्टल सुरु करण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज येथे सांगितले.
यासंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कामगार विभागाचे आयुक्त वाय. ई. केरुरे, कामगार उपसचिव श्रीमती भरोसे, मुंबई घरेलू कामगार संघाचे अध्यक्ष अँड. अनिल घुमणे, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ, महाराष्ट्राचे सर्व प्रांत पदाधिकारी आणि कामगार विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. निलंगेकर यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील कामगार विषयक तक्रार नोंदवण्यासाठी आणि त्याच्या किमान वेतनाचा हक्क त्यांना प्राप्त करून देण्यासाठी एका वेबपोर्टलची निर्मिती करण्यात येईल. या वेबपोर्टल मध्ये तक्रार करणाऱ्या कामगारांच्या अधिकारांना संरक्षण देण्यात येईल. तसेच तक्रार केलेल्या कामगाराला कामावरून आगाऊ सूचना न देता काढता येणार नाही अशी तरतूद करण्यात येणार आहे.
या सर्व तक्रारीचा साप्ताहिक अहवाल हा मंत्री महोदयांच्या कार्यालयाला देणे आवश्यक असेल आणि त्याची एक प्रत कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात येईल. या वेबपोर्टलच्या अंमलबजावणीसाठी एक समिती तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये कामगार विभागाचे आयुक्त हे प्रमुख असतील आणि इतर विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधीं असतील, असे श्री. निलंगेकर यावेळी म्हणाले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.