मुंबई -
अभियांत्रिकी आणि औषणनिर्माण अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा (एमएमचटी-सीईटी) 11 मे 2017 रोजी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत घेण्यात आली होती. या परीक्षेबाबातची उत्तरसूची जाहीर करणे, उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर ई-मेलद्वारे स्कॅन उत्तरपत्रिकेची प्रत उपलब्ध करुन देणे, उत्तरसूची व प्रश्नांना आक्षेप मागविणे याबाबतचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.
26 मे 2017 रोजी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर http://www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2017 ऑनलाईन प्रोव्हिजनल उत्तरसूची अपलोड करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना अधिकृत ई-मेलद्वारे दिनांक 26 मे ते 28 मे या दरम्यान ऑनलाईन अपलोड करण्यात आलेल्या उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबत तक्रार करता येईल. विद्यार्थ्यांनी आपली तक्रार mhtcet2017@dtemaharashtra.gov.in येथे अधिकृत फॉर्मेटमध्ये सादर करावी. विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणच्या http://www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2017 through candidate login स्कॅन ओएमआर उत्तरपत्रिका 26 मे ते 2 जूनपर्यंत पाहता येतील.
विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत तसेच उत्तरपत्रिकेबाबत काही आक्षेप असल्यास किंवा काही हरकत असल्यास रजिस्टर ई-मेलद्वारे आपला अर्ज mhtcet2017@dtemaharashtra.gov.in येथे पाठवावा लागेल, असे राज्य सीईटी सेलचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment