BREAKING NEWS

Monday, May 1, 2017

सेनगांव येथील संत नामदेव कृषी बाजारात हळदीला चांगला भाव असल्याने शेतक-यांनी विक्रीस आनावा- व्दारकादासजी सारडा


महेंद्र महाजन जैन /  रिसोड -



सेनगांव:- सेनगांव शहराजवळील मकोडी पाटीवर गणेश मंदिराजवळील संत नामदेव कृषी बाजारात हळदीला चांगला भावा मिळत असल्याने शेतक-यांनी आपली हळद संत नामदेव कृषी बाजारात विक्रीस आनावी असे आवाहन समितीचे विश्वस्त तथा माजी जि.प.सदस्य व्दारकादासजी सारडा यांनी केले आहे.
शेतक-यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा याच उद्देशाने संत नामदेव कृषी बाजाराची स्थापना केली असुन आता पर्यंत शेतक-यांच्या शेतीमालाला या बाजारामध्ये चांगला भाव मिळाल्याने सेनगांव तालुक्यासह जिंतुर, हिंगोली, विदर्भातुन शेतकरी आपला शेतीमाल संत नामदेव कृषी बाजारात घेऊन येत आहेत. यावर्षी सोयाबिनला सुध्दा चांगला भाव होता. संत नामदेव कृषी बाजारात आठ दिवसापुर्वी हळद खरेदीला सुरुवात झाली असुन भाव ही चांगला मिळत असल्याने दुरवरुन शेतकरी आपली हळद घेऊन येत आहेत. आज दि.०१ मे सोमवार रोजी हळदीला ५००० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. संत नामदेव कृषी बाजार शेतक-यांचे हित जोपासुनच भाव देत असल्याने दुरवरुन शेतकरी आप आपला शेतीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीस आनत आहेत. शेतक-यांचे हित लक्षात घेता संत नामदेव कृषी बाजारात हळद खरेदीला सुरुवात केली असुन या बाजारात शेतक-यांनी आपली हळद विक्रीस आनावी असे आवाहन संत नामदेव कृषी बाजार चे संचालक तथा माजी जि.प.सदस्य व्दारकादासजी सारडा व गिरीधारजी तोष्णीवाल यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.