BREAKING NEWS

Saturday, June 10, 2017

*अमरावती रोडवर भिषण अपघात एक ठार*


अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-


-परतवाडा अमरावती रोडवर भिषण अपघात झाला.त्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
परतवाडा अमरावती रोडवर अष्टमासीध्दी प्रवेश व्दाराजवळ दुपारी दोनच्या सुमारास अमरावती कडे भरधाव जाणा-या ट्रक क्रमांक एम.पी.48 एच 0126 ने विरुद्ध दिशेला झाडाखाली आपल्या हीरो होंडाची सीबी झेड एम.एच. 27 ए.क्यु.7234 क्रमांकाच्या उभ्या दुचाकी ला रस्त्यावरील एका इंडीका ला ओव्हरटेक करतांना जबर धडक दिली.यामध्ये पाऊस येत असल्याने झाडाखाली आपल्या दुचाकी जवळ आडोश्याला उभे असलेल्या परतवाडा येथील प्रसिद्ध शुभम स्टील व एम.आय.डी.सी. मध्ये असलेल्या शिवम फर्म चे संचालक प्रवीण ज्ञानचंद जैन उर्फ टम्मी शेट(50) यांचा चिरडून मृत्यू झाला.धडक एवढी जबर होती की अमरावती कडे जाणारा ट्रक झाडावर आदळून दुस-या बाजूला परतवाड्याकडे पलटून उभा राहिला.प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून ट्रक चालक व वाहक ट्रक सोडून पळ काढुन पसार झाले अचलपूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार आधारसींग सोनोने घटनास्थळी दाखल होवून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ऊपजील्हा रुग्णालयात रवाना केला व विस्कळीत रहदारी पुर्ववत करून पुढील तपास करीत आहेत.वृत्त लीहीस्तोवर कुणाला अटक करण्यात आली नाही.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.