BREAKING NEWS

Sunday, June 11, 2017

सक्सेस पॉईंट चा यदुराज देशमुख जिल्ह्यात पहिला

चांदुर बाजार /- अमरावती /--


सीबीएसई बोर्डाचा नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये सक्सेस पॉईंट सायन्स अकॅडमी मधील वर्ग चा विद्यार्थी यदुराज स्वप्नील देशमुख याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे .त्याला 98.40%  गुण मिळाले त्याचा क्लास च्या संचालिका सौ तिवारी मॅडम यांनी त्याचा सत्कार केला. याच स्कुल मधील अपूर्वा पेठे हिला सामाजिक शास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले तिचा एकूण गुणांची टक्केवारी 97.40 % आहे . तर पराग जयस्वाल या विद्यार्थ्याला गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले त्याचा गुणांची टक्केवारी 97.20 % इतकी आहे या दोघांचा सत्कार भुस्कडे मॅडम व अग्रवाल मॅडम यांनी केला . तर खुशबू नांगलिया हिला 95.60 % ,रितिका भेले हिला 92.40 % , राधा नांगलिया हिला 92% ,मलिक रंगारीला 90 % , तर प्राप्ती पवार हिला 85% गुण मिळाले आहे  या सदर विद्यार्थ्यांचा सत्कार तायडे मॅडम व गजानन राऊत सर यांनी केला .
सक्सेस पॉईंट च्या संचालिका सौ तिवारी मॅडम यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन , शिक्षकांची मेहनत व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव यामुळेच आम्ही हे अभूतपूर्व यश प्राप्त करू शकलो
    असे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे. या सत्कार समारंभामध्ये सर्व श्री तिवारी सर , काळे सर, अंकुश सर , शाह सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले , कार्यक्रमाचे  संचालन कु साक्षी पवार हिने केले

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.