BREAKING NEWS

Thursday, June 1, 2017

*उधारी वसुली ची अनोखी शक्कल बिरजू टी.स्टाल देवळी अचलपूर येथे लागलेले सुचना फलक सर्वांचे आकर्षण*


अचलपुर  / श्री प्रमोद नैकेले/-


उधारी वसूल करण्या करिता दुकानदारांना किती प्रयत्न करावे लागतात हे त्यांनाच माहित पण अचलपूर येथील बिरजू टी स्टाल येथे उधारी वसुली ची अनोखी शक्कल सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
  अचलपूर देवळी सराफा लाईन येथे असलेल्या बिरजू टी स्टाल चे संचालक रामदास उर्फ बिरजू बिसने यांनी आपल्या दुकानात एक फलक लावले आहे.त्यावर असे नमूद करण्यात आले आहे की *सर्व चहा धारकांना सुचित करण्यात येते की ज्यांचे कडे चहाची थकबाकी असेल त्यांनी त्वरित बिरजूकाका टी स्टाल येथे जमा करावी अन्यथा चहा पुरवठा खंडीत करण्यात येईल याची नोंद घ्यावी* असे सुचवण्यात आले आहे.ही सुचना सर्वांचे आकर्षण ठरत आहे चक्क ग्राहक कौतुकाने हे फलक वाचायला येतात व याबद्दल बिरजू यांचे कौतुक करतात.तसेही बिरजू सराफा लाईन मध्ये हसतमुख व विनोदी व्यक्तीमत्व आहे यापूर्वी त्यांनी असेच फलक लावले होते त्यावर असे नमूद केले होते की जोपर्यंत कश्मिर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उधारी बंद.अशा विविध संदेशाने बिरजू टी स्टाल नागरिकांचे चर्चेचा विषय बनत असते पण सर्व सराफा लाईन बिरजू बीसने यांचे सोबत आपुलकीने वागतात.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.