Monday, June 5, 2017
‘मीडिया वॉच ‘२०१६ सर्वाेकृष्ट दिवाळी अंक ठरल्याबद्दल संपादक अविनाश दुधे यांचा सपत्निक सत्कार अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ, चांदूर रेल्वे शाखेने केला सत्कार
Posted by vidarbha on 1:58:00 PM in चांदूर रेल्वे/ शहेजाद खान /- | Comments : 0
चांदूर रेल्वे/ शहेजाद खान /-
‘मीडिया वॉच ‘दिवाळी अंक २०१६ ला मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई च्या वतीने सर्वाेत्कृष्ट
दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, चांदूर रेल्वे
शाखेच्या वतीने ‘मीडिया वॉच ‘चे संपादक अविनाश दुधे यांच्या सपत्निक सत्कार करण्यात
आला.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई (स्थापना ऑगष्ट १९४९) यांच्या वतीने देण्यात येणारा
२०१६ चा सर्वाेकृष्ट दिवाळी अंक पुरस्काराचे मानकरी 'मीडिया वॉच' दिवाळी अंक ठरला.
त्यानिमित्त ‘ आम्ही सारे ‘ फाऊंडेशन,चांदूर रेल्वे टिमच्या वतीने चांदूर रेल्वे येथील जिल्हा
परिषद हायस्वूâलच्या प्रांगणावर आयोजित ‘प्राणात चंद्र ठेवू ‘ गजल मैफिलच्या कार्यक्रमात
गजलनवाज ' भीमराव पांचाळे ‘ यांच्या प्रमुख उपस्थितीत मीडिया वॉच ‘ चे संपादक अविनाश
दुधे व त्यांची पत्नी प्रतिभाताई यांचा अ.भा.ग्रा.पत्रकार संघ विदर्भ कार्याध्यक्ष युसूफ खान,
तालुकाध्यक्ष प्रविण शर्मा यांच्या हस्ते शाल व स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार प्रभाकर भगोले, उत्तमराव गावंडे, अमोल
गवळी, प्रा.रवींद्र मेंढे, विवेक राऊत, बाळासाहेब सोरगीवकर, अमर घटारे, प्रा.सुधिर तायडे,
प्रशांत कांबळे, संजय मोटवानी, अभिजीत तिवारी, मनिष खुने, मंगेश बोबडे, धीरज नेवारे,
प्रा.प्रसेनजित तेलंग, शहजाद खान, विनय गोटेफोडे, मधुकर बावणे, इरफान पठाण, राजेश
सराफी, राहुल देशमुख, सुभाष कोटेजा उपस्थित होते. या कार्यक्रमाला ‘आम्ही सारे 'चे
चंद्रकांत वानखडे, अर्जुन ठोसर, विजय विल्हेकर, चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी ललीत
वNहाडे, संतोष अरसोड, प्रा.संजय वानखडे, प्रा.संजय घरडे, नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी,
ठाणेदार ब्रम्हानंद शेळके आदी मान्यवरासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment