BREAKING NEWS

Friday, June 9, 2017

मत्स्यव्यवसायात जिल्हा अग्रेसर करु या - जिल्हाधिकारी श्री सुहास दिवसे

      भंडारा:- 



 पूर्व विदर्भात सद्यस्थितीत मत्स्यपालन अत्यंत कमी असून मत्स्यव्यवसायाला मोठया प्रमाणात वाव आहे. असे असतांना भंडारा जिल्हयात सुध्दा मत्सयव्यवसाय कमी असून सहकारी संस्थांमध्ये संघटीत मच्छीमार समुदायाकडे जलाशय स्त्रोत वापरण्याचे अधिकार आहेत. मात्र मत्स्यपालनासाठी व व्यवसायासाठी लागणारी साधनं अपूरी असल्याने मत्स्यव्यवसाय मोठया प्रमाणात होत नाही. तलाव तेथे मासोळी या अभियानाद्वारे मच्छीमार संस्थांना साधनं व सुविधा देण्याचा शासनाचा निर्धार असून याद्वारे भंडारा जिल्हा मत्स्योत्पादनात अग्रेसर करु या, असे खात्री जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली.
          आज जिल्हाधिकारी कार्यालयात मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय वि.का. पसारकर व सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ह.र. पाटील यावेळी उपस्थित होते. मासे पालनासाठी यावर्षी 63 तलावाची निवड करण्यात आली असून या तलावात मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मत्स्यजिरे टाकण्यात येतील. यावर्षीच तलाव तेथे मासोळी अभियान सुरु केले असून या अभियानांतर्गत संस्थांना सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
           शासन सुविधा पुरवीत असले तरी सहकारी संस्थांनी स्वत:हून पुढाकार घेवून मासे उत्पादन जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. एके काळी मासे उत्पादन करण्याचे आपले स्वप्न होते असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, या जिल्हयात मासेमारीला मोठया प्रमाणात वाव असून आपण एकत्रितपणे मासे उत्पादन वाढवू या आणि तुमच्या माध्यमातून माझे स्वप्न पूर्ण करु, असे त्यांनी सांगितले.
           या अभियानाचे हे पहिले वर्ष असून यावर्षी चांगले उत्पादन करण्याचे आव्हान स्विकारा, पुढील वर्षी मानवी विकास मिशन व जिल्हा नियोजन मधून यासाठी वेगळया निधीची तरतूद करण्याची हमी देतो, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. गोळया पाण्याच्या मासोळीला मोठी मागणी आहे. त्यामुळे आपल्याकडील मासे इतर राज्यात निर्यात होवू शकतात. यासाठी लागणारी शितगृहे जिल्हयात उभारण्याचा मानस जिल्हाधिकारी यांनी बोलून दाखविला.
            मच्छीमार सहकारी संस्थांनी त्यांच्यातील तरुण व होतकरु मुलांची यादी प्रशासनाला दयावी. या मुलांना प्रशासनातर्फे प्रशिक्षण देवून मत्स्यव्यवसाय, बाजारपेठ आदि बाबत प्रशिक्षित केले जाईल. या मुलांचा लाभ मच्छीमार संस्थांना मोठया प्रमाणात होऊ शकेल. त्याचप्रमाणे ज्या राज्यात शास्त्रोक्तपध्दतीने मासे पालन केल्या जाते. त्या राज्याचा अभ्यासदौरा काढण्यात येईल. यावेळी सदस्यांनी तलावाच्या नुतनीकरणाची विनंती केली असता जिल्हाधिकारी म्हणाले की, तलाव नुतनीकरणासाठी प्रयत्न केले जातील. बोटूकलीचे उत्पादन यावर्षी दुप्पट करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्था सदस्यांनी मांडलेल्या शंका व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीस अनेक संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.