अचलपुर:-(श्री प्रमोद नैकेले )
शहरातील माळवेशपुरा येथील न्यू भीम शक्ति मंडळ द्वारा डा बाबासाहेब आंबेडकरांच्या 126 वी जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालयात गरजू रोग्यांना फळ, दुधचे वितरण अचलपूर चे ठानेदार नरेन्द्र ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी नरेन्द्र ठाकरे यांनी म्हटले कि बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी गरीबांची मदत केली नेहमीच गरिबांवर होत असलेल्या अत्याचार ना संपवण्याकरीता त्यांनी आवाज़ उठवला,दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यावे असे प्रतिपादन करून न्यू भीम शक्ति मंडळ च्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले यावेळी न्यू भीम शक्ति मंडळाचे मनिष गवई,नरेन्द्र वानखडे,.सिद्धार्थ खंडारे ,नरेन्द्र गवई,मनोहर गवई,शेखर नाईक, रमेश गवई,अक्षय खराडे,रुपेश गवई,मिलिन्द वाकोडे,.विनोद बोरखडे,सचिन गवई,सुखदेव वाकोडे,आनंद बन्सोड़,सतिश गवई,सुधिर गवई,रामदास गायकवाड अजाबराव गवई व इतर सदस्य तसेच मान्यवर नागरीक उपस्थीत होते.
