BREAKING NEWS
Showing posts with label कोल्हापूर -. Show all posts
Showing posts with label कोल्हापूर -. Show all posts

Sunday, December 11, 2016

भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ राजासिंह ठाकुर यांची तोफ आज करवीरनगरीत धडाडणार !

आज कोल्हापूर येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !

     कोल्हापूर - कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला आहे. कोपरा सभा, वैयक्तिक संपर्क, कट्टा बैठका आणि सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून लक्षावधी लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला आहे. याला सर्व समाज घटकांतून उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 
     ९ डिसेंबर या दिवशी शहरात झालेल्या वाहनफेरीमुळे करवीर नगरीत भगवा उत्साह संचारला आहे. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे ११ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता होत असलेल्या सभेची सिद्धता आता अंतिम चरणात पोेचली आहे. 

Tuesday, December 6, 2016

अखंड भारताची निर्मिती होणारच ! - शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

कोल्हापूर - 

सत्ययुगापासून कलियुगापर्यंत अनेक वेळा अशी परिस्थिती होती की परिस्थिती पालटणे शक्य नाही, असे सर्वांना वाटत होते, दुर्जन प्रबळ होते; मात्र प्रत्येक वेळी सज्जन शक्तींनी त्यांच्यावर मात केली. रामायणकाळात रावणाचा पराभव झाला, द्वापरयुगात दुर्योधनाचा पराभव झाला. अगदी अलीकडच्या काळातही चाणक्यने चंद्रगुप्ताच्या साहाय्याने नंदाचा पराभव केला, छत्रपती शिवाजी महाराज-रामदास स्वामी यांचेही उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याचप्रकारे पूर्वी भारत अखंड होता आणि सध्या तो नसला, तरी अखंड भारताची निर्मिती ही होणारच आहे, असे मार्गदर्शन पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ - पुरीपीठाधीश्‍वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती महाराज यांनी केले. 


श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद 
सरस्वती यांनी मार्गदर्शनाच्या वेळी सांगितलेली अन्य सूत्रे....


१. वेदामध्येही सगुण ईश्‍वराचे वर्णन आहे. कलियुग ४ लक्ष ३२ सहस्र वर्षांचे असून आता केवळ ५ सहस्र ११८ वर्षे झाली आहेत. 
२. ज्योतिषशास्त्राविषयी भारतात सखोल अभ्यास झाला असून त्याद्वारे अनेक गोष्टी वर्तवणे शक्य आहे. दिनांक ही पाश्‍चात्त्यांची पद्धत असून भारतीय लोक तिथीनुसार कृती करतात आणि तेच योग्य आहे. 
३. वैराग्य, समाधी, तत्त्वज्ञान, मोक्ष या मार्गाने साधकाची वाटचाल होते. 

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.