BREAKING NEWS
Showing posts with label चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान ) --. Show all posts
Showing posts with label चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान ) --. Show all posts

Saturday, December 17, 2016

मायक्रो फायनांस ची पठानी वसूली थांबवा - मानवाधीकार संघटनेचा एल्गार; महिलांचा तहसील कार्यालयाला घेराव

चांदुर रेल्वे:- (शहेजाद  खान )  --



नोटा बंदीच्या निर्णायानंतर इतर क्षेत्रात परिणाम झाला तसाच मायक्रो फायनांस चे कर्ज घेणाऱ्या महिला बचत गटावर ही झाला असून कंपन्या पठानी पद्धतीने त्यांचे कर्ज वसूली करीत असल्याचे दिसून येत आहे, या मुळे महिलांमधे दहशत निर्माण होत आहे, त्यामुळे शासनाने मायक्रो फायनांस कंपन्यांवर अंकुश लावत त्यांची पठानी वसूली थांबवावी असा इशारा देत शेकडो महिलांनी तहशील कार्यालयला घेराव घातला, यावेळी निलेश विश्वकर्मा यांनी या महिलांचे नेतृत्व केले
मानवाधिकार संघटनेच्या वतीने नुकताच तहशील कार्यालयावर मायक्रो फाइनांस कंपनीच्या विरोधात तहसील कार्यालयापुढे एक दिवशीय धरने देण्यात आले, यावेळी निलेश विश्वकर्मा यांच्या सह संघटनेचे पदधिकारिअशोक बंसोड़,संजय ठाकुर,प्रा अर्जुन सरदार, धीरज वाघमारे खुशाल खडसे, हरिभाऊ चवरे,आदी मंचावर उपस्थित होते, मायक्रो फाइनांस च्या कर्ज वाटपाने महिलांचा उद्धार व्हायचा तर त्यामुळे त्यांचे संसार अडचणीत येत आहे, कंपनीच्या पठानी वसूली मुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे उदहारण तालुक्यात घडले आहे, ज्या पद्धतीने शासनाने सावकारी कर्ज माफ़ केले त्याच धर्तीवर मायक्रो फाइनांस चे कर्ज ही माफ़ व्हावे असे मत निलेश विश्वकर्मा यांनी उपविभागीय अधिकारी ललित वर्हादे यांच्या पुढे मांडले, तत्पूर्वी अनेक मान्यवरांनी आलेल्या महिलांपुढे आपले मत व्यक्त केले, यावेळी तालुका व शहरातून हजारो महिला उपस्थित होत्या, यावेळी मानवधिकार संघटनेचे दिनेश जगताप,प्रकाश रंगारी, राष्ट्रपाल मेश्राम, लताताई बागडे, रमेश उरकुड़े आदी उपस्थित होते,

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.