BREAKING NEWS
Showing posts with label चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )/-. Show all posts
Showing posts with label चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )/-. Show all posts

Sunday, January 1, 2017

चांदुर रेल्वे शहरात एमआयएमच्या एेंट्रीचे संकेत - लवकरच तालुका- शहर कार्यकारीणी गठीत होण्याचे संकेत - शहरात एमआयएम नेत्यांची बैठक संपन्न

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )/-



सद्यस्थितीत सगळीकडे चर्चेत असलेल्या ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाच्या चांदुर रेल्वे शहरात ऐंट्रीचे संकेत मिळत आहे.  राज्यात सगळीकडे पक्ष विस्तार होत असतांना याच हेतुने शहरात सुध्दा एका छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकांनी पक्षाशी जुळण्याची इ़च्छा दर्शविली.


       स्थानिक काझीपुरा येथे संपन्न झालेल्या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणुन अमरावती येथील  एआयएमआयएमचे अब्दुल नाजीम, सलाऊद्दीन खान, फिरोज खान कुरैशी, शहेजाद खान, मो. इम्रान, इकराम कुरैशी, शाहाजाद खान आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सगळीकडे अनेक समस्या व प्रश्न आहेत. यासाठी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करणार आहोत. तळागाळातील व मागासवर्गीय लोकांना न्याय देऊन पक्ष विस्ताराचे काम एमआयएम करीत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी उपस्थित शहरवासीयांसोबत प्रमुख पाहुण्यांनी संवाद साधला व शहरात कार्यकारीणी लवकरच गठीत करण्याचे संकेत दिले. या बैठकीला चांगला  प्रतिसाद मिळाला असुन इतर पक्षातील अनेकांचा एमआयएममध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.


      यावेळी बैठकीला अनिस सौदागर, इस्माईल  कुरैशी, वाहिद कुरैशी, मो. जफर खान, शकील सौदागर, मो. अकबर खान, आसीफ खान, समीर खान ताबीश कुरैशी, इम्रान सौदागर, सलमान पठाण, हारूण कुरैशी, हरीस सौदागर, वसीम खान, आदील सौदागर यांसह अनेक शहरवासी प्रामुख्याने उपस्थित होते.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.