BREAKING NEWS
Showing posts with label डोंबिवली. Show all posts
Showing posts with label डोंबिवली. Show all posts

Monday, November 14, 2016

श्री योगवेदांत सेवा समितीच्या वतीने आदिवासी कुटुंबियांना दिवाळी भेट !

  डोंबिवली - पूज्यपाद आसारामजी बापू प्रेरित श्री योगवेदांत सेवा समितीच्या वतीने आदिवासी कुटुंबियांची दिवाळी आनंदाने साजरी करण्याच्या हेतूने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आदिवासी पाड्यातील गरीब कुटुंबियांना नवीन कपडे, आयुर्वेदिक तुलसी गोळी, तसेच सौंदर्य प्रसाधन साहित्य यांचे वाटप करण्यात आले. ४०० आदिवासी कुटुंबियांनी याचा लाभ घेतला. आदिवासी पाड्यात अशा प्रकारचा दिवाळी पहाट कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकीतून आदिवासींना साहाय्य करण्याचे समितीचे हे २० वे वर्ष आहे. या कार्यक्रमातर्गत या ठिकाणी बालसंस्कारवर्गदेखील आयोजित करण्यात आले होते. त्याचा शेकडो मुलांनी लाभ घेतला. साडी-चोळी, टॉवेल, शर्ट-पॅन्ट, मिठाई, लहान मुलांना तुलसी आयुर्वेदिक गोळी, टि-शर्ट, कंगवा आणि अन्य सौंदर्य प्रसाधन साहित्याचे वितरण करण्यात आले.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.