BREAKING NEWS
Showing posts with label नालासोपारा–. Show all posts
Showing posts with label नालासोपारा–. Show all posts

Friday, January 6, 2017

एकाग्रतेने अभ्यास होण्यासाठी नामजप आवश्यक ! – श्री. दीप्तेश पाटील

नालासोपारा– 

प्रत्येक विषयाचा अभ्यास आवडीने आणि मनापासून करावा. एकाग्रतेने अभ्यास होण्यासाठी नामजप करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. दीप्तेश पाटील यांनी केले. येथील संतोष भवन येथील भगवान श्री राम अवधूत विद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी श्री. दीप्तेश पाटील यांनी अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी, स्वत:मध्ये गुणांची वृद्धी कशी करावी, याविषयीही सांगितले. १३० विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या वेळी श्री. दीप्तेश पाटील म्हणाले, निराशावादी विचार मनात आणून आत्महत्या करणे उचित नाही. प्रत्येक युवकाने स्वत:च्या पालकांचा विचार करावा. आज आपल्याला शिकवले जाते की, सर्व शोध हे पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञांनी लावले आहेत; मात्र तसे नसून याच संस्कृतीतील महान ऋषीमुनींनी जगातील सर्वांत महत्त्वाचे शोध लावले आहेत, हे लक्षात घ्यावे !

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.