BREAKING NEWS
Showing posts with label प्रतिनिधी-समीर देशमुख सह महेंद्र मिश्रा शेगांव. Show all posts
Showing posts with label प्रतिनिधी-समीर देशमुख सह महेंद्र मिश्रा शेगांव. Show all posts

Wednesday, December 7, 2016

स्थानिक स्वराज्य संस्था नगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेनिमित्त -गृहमंत्री डॉ. रणजित पाटील यांची मुलाखत

प्रतिनिधी-समीर देशमुख सह महेंद्र मिश्रा शेगांव
--

स्थानिक स्वराज्य संस्था नगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेनिमित्त महाराष्ट्र राज्यचे गृहराज्य मंत्री डॉ.रणजित पाटील हे तेथे आले असता भाजप शहराध्यक्ष डॉ.मोहन बानोले यांच्या निवासस्थानी 24 नोव्हेबर रोजी संध्याकाळी 6 वा तथा त्यांची मुलाखत घेतली डॉक्टर असल्यामुळे विशेष करून शेगांव शहरात सईबाई मोटे शासकीय रुग्णालय आहे.ते दिसायला फक्त सुंदर व मोठेे आहे पण तेथे कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही व डॉक्टर सुद्धा उपलब्ध नाहीत यावर आपण क्या उत्तर द्याल? अशा प्रश्ना पासून सुरवात झाली.तर श्री रणजित पाटील म्हणाले हो नक्कीच मी डॉक्टर पेशाचा असल्यामुळे मला रुग्णांची चांगली जाणीव आहे तरी तिथे संपूर्ण सुविधा मिळाल्या पाहिजे त्याकरिता मी आ.डॉ.कुटे यांच्यासोबत चर्चा करून एक बैठक लावून घेतो.याआधी आम्ही  काही महिन्या अगोदर वॊकिंग  इंटरव्ह्यू सुद्धा घेतले होते. आपले कागद पत्र आणा व नोकरी जोइंन करा पण पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.आम्ही तिथे सिटीस्कॅन  मशीन सुद्धा देऊ फक्त त्याची ई-रिपोर्टिंग करावी लागते ई-मिटिंगची मशीन सुद्धा मुंबईला जोडता येते त्या पध्द्तीने ऍडव्हान्स करावी लागेल.
मागील सहा वर्षापासून शेगांव विकास आराखडा सुरु आहे पण अद्याप RD18 पालखी मार्ग पूर्ण झाला नाही का?
ना.रणजित पाटील:- हो बरोबर आहे याला थोडा उशीरच झाला आहे. पण याला बऱ्याच गोष्ट जबाबदार आहे परंतु आमचे सरकार आल्यापासून या विकास आराखड्याला गतिमान करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे मागील चार वर्षांआधी आम्ही धूळ खात येत होतो पण या एक-दोन वर्षात शेगांव आता कात टाकताना दिसत आहे. RD18 हा पालखी मार्ग असेल तर तो लवकरच शंभर टक्के पूर्ण होईल.
संत नागरी भविष्यात स्मार्ट सिटी होईल का?
तर उत्तर देत ते  म्हणाले की शंभर टक्के अहो, मी तुम्हांला सांगतो आशीर्वाद  संत  गजानन महाराजांचा आहे व ते सुबुद्धी आम्हा  राज्यकर्त्यांना देतील. येथे जास्तीत जास्त निधी येईल व गजानन महाराज आमच्याकडून करून घेतली.
जर नगर पालिकेत मध्ये बहुमताने  आपली सत्ता आली तर आपण विशेष काय कराल?

ना.श्री रणजित पाटिल म्हणाले आम्ही वैशिष्ट्यपूर्ण निधी देऊ विशेष रस्ता अनुदान देऊ माझ्या मते शहरात चांगल्या प्रकारचे मोठे सांस्कृतिक सभागृह असावे एक अभ्यासिका असावी. युवकांसाठी अत्याधुनिक व्यायाम शाळा असावी. आमची तर अशी ईच्छा आहे कि,शेगांव नगरीने टुरिस्ट सेंटर बनाव मोट्या प्रमाणात वसुली कर उपलब्ध व्हावा.
आम्हा पत्रकारांकरिता पत्रकार भवन उभारू शकाल का?
तर म्हणाले की तुम्ही नगर पालिकेकडे प्लॉट मागावा. नुसते पत्रकार भवनच नाही तर आम्ही आपल्या निवासासाठी घरे बांधून देऊ. अशा प्रकारे विविध मुद्यावर त्यांच्याशी सदर प्रतिनिधी ने दिलखुलास बातचीत केली.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.