BREAKING NEWS
Showing posts with label प्रमोद नैकेले/- अचलपूर:-. Show all posts
Showing posts with label प्रमोद नैकेले/- अचलपूर:-. Show all posts

Thursday, December 1, 2016

सुनिता फिसके नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून दुहेरी विजयी तर पतीराज श्री नरेंद्र फिसके अवघ्या चौरेचाळीस मतांनी पराभूत​

प्रमोद नैकेले/-
अचलपूर:-



अचलपूर नगरपालिका निवडणूकीत कही खुशी कही गम असा निकाल लागला.
अचलपूर या जुळ्या शहरातील मतदारांनी यावेळी जुन्या नगरसेवकांना घरचा अहेर दिला ज्यांनी आपल्या कार्यकाळात नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले व प्रभागात विकास घडवून आणला अशा काहीच नगरसेवकांना पुन्हा निवडून दिले तर बाकीच्या नगरसेवकांना माजी ही उपाधी देवून घरी बसवले.तर नगराध्यक्ष म्हणुन मैदानात उतरलेल्या शिवसेना उमेदवार सुनिता नरेंद्र फिसके यांना नगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक १९ मधून नगरसेवक म्हणून असा दुहेरी विजय प्राप्त करून दिला तर त्यांच्या या यशप्राप्तीकरीता अहोरात्र प्रयत्न करीत असलेल्या त्यांच्या पतीराज नरेंद्र फिसके यांचा प्रभाग क्रमांक १८ मधून अवघ्या चौरेचाळीस मतांनी पराभव झाला यामुळे कही खुशी कही गम असा निकाल लागला पण एकंदरीत शहरात निकालाबाबत उल्हास व आनंद व्यक्त होत आहे.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.