BREAKING NEWS
Showing posts with label मुंबई. Show all posts
Showing posts with label मुंबई. Show all posts

Monday, May 8, 2017

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ - केंद्रीय आरोग्यमंत्री

मुंबई-  


महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या मागणीसंदर्भात आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. जे.पी. नड्डा यांनी आज येथे सांगितले. आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घडवून चर्चा करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सभागृहात दिले होते. त्याची पुर्तता करीत आज त्यांनी आशा स्वयंसेवी शिष्टमंडळाची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत भेट घडवून आणली.
मुंबई भेटीवर आलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेट घेतली. यावेळी डॉ. सावंत यांनी पीसीपीएनडीटी कायदा, गर्भपात कायदा, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा यामध्ये काळानुरुप बदल करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेली गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्याबरोबर समन्वय साधणे तसेच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या नियमात बदल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
1971 सालच्या गर्भपात कायद्यांतर्गत गर्भपात केंद्र नुतनीकरणाची सोय तीन किंवा पाच वर्षाची करण्यात यावी. तसेच आदिवासी भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक उमेदवारांची विशेष गुणवत्ता यादी तयार करुन अशा उमेदवारांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाच वर्ष किमान त्याच क्षेत्रात सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
परदेशातून भारतात खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सोयीचे व्हावे म्हणून प्रमाणीत मार्गदर्शक तत्वे (एसओपी) करणे आवश्यक असून त्यामुळे दोन देशांत आणि दोन रुग्णसंस्थांमध्ये विसंवाद होणार नाही अशी विनंती देखील डॉ. सावंत यांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केली.
यावेळी आशा स्वयंसेविकांना मानधन वाढवून मिळावे तसेच त्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आशा स्वयंसेविकांच्या विविध समस्या तसेच मागण्यांसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली.

Wednesday, April 19, 2017

पाकिस्तानी ब्रँडना मनसेचा कडवा विरोध...


मुंबई : 




मनसेनं आपला पाकिस्तानविरोधी आणि रोष नेहमीच कायम ठेवला असून तो दिवसेंदिवस आणखी तीव्र होत आहे.  कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना  गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण महाराष्ट्र विविध आंदोलनाच्या माध्यमातून पाकिस्तान विरोधात आंदोलन करत आहे.  गेल्या काही दिवसांपासून पॅलेडियम मॉलमध्ये  झारा ब्रँडच्या शॉपमध्ये पाकिस्तानी कपड्यांची विक्री करीत आहे हि बाब मनसेच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता, विभाग अध्यक्ष नगरसेवक दत्ता नरवणकर, भूपेन जोशी आदी कार्यकर्त्यांनी लोअरपरळ येथील  झारा शोरूमला धडक देऊन  आज झारा ब्रँडच्या शॉपमधल्या मालाची मनसे कार्यकर्त्यांनी नासधूस केली.  याअगोदरच मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी  मालाड इनॉर्बिट, फोनिक्स कुर्ला आदी झाराचे शोरूम असलेल्या मॉलमध्ये लेखी पत्राद्वारे त्यांना पाकिस्तानी कपडे न विकण्याचा इशारा दिला होता.
पाकिस्तानामध्ये तयार झालेले कपडे झारा शोरूममध्ये विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांकडे होती. कार्यकर्त्यांनी  आंदोलन करीत पाकिस्तान बनावटीच्या कपडे रॅकमधून फेकून देत पायदळी तुडवले. आणि संताप व्यक्त केला. पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या वस्तू विकू नका, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाला सामोरं जायला तयार राहा, असा धमकी वजा इशारा मनसेच्या वतीने मुंबईतील सर्व मॉल्स आणि डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या व्यपस्थापनाला दिला आहे.

Monday, March 20, 2017

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – श्री. संतोष पाताडे, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार

मुंबई – 
हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. हिंदूंचे मोठ्या संख्येने होणारे धर्मांतर रोखायचे असेल, तर हिंदूंना संघटित व्हावे लागेल. धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यासाठी हिंदूंनी एकत्रितपणे केंद्र शासनावर दबाव आणावा, असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ सेवा परिवाराचे श्री. संतोष पाताडे यांनी केले. हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने धर्मांतरबंदी कायदा करावा, या मागणीसाठी अंधेरी (पू.) रेल्वे स्थानकाबाहेर लेफ्टनंट सचिन मिरजकर चौक येथे १८ मार्चला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
मागील मासात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ घेऊन जाण्यास शासनाने घातलेल्या बंदीच्या निर्णयाचा आंदोलनात विरोध करण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा परिवार, औदुंबर दत्त समिती, हिंदु गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी चळवळीला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आंदोलनाच्या वेळी अनेक हिंदूंनी थांबून जिज्ञासेने विषय जाणून घेतला आणि स्वाक्षर्‍या नोंदवून शेकडो हिंदूंनी शासनाचा निषेध केला.
क्षणचित्र – आंदोलनातील विषय ऐकल्यावर प्रभावित होऊन काही युवक उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले आणि आंदोलन संपेपर्यंत थांबले.

Sunday, March 19, 2017

फतवे घोषित करणारे मौलवी समाजद्रोही आणि धर्मद्रोहीच ! – श्री उद्धव ठाकरे

मुंबई– 
मुसलमान मौलवींकडून जारी केले जाणारे फतवे ही आपल्या देशात एक डोकेदुखीच होऊन बसली आहे. कुणीही मुल्ला उठतो आणि कुराण आणि शरीयतचा आधार घेऊन वाट्टेल तो फतवा काढतो. असे बेलगाम फतवे जारी करणार्‍यांवर कुणाचेच नियंत्रण उरलेले नाही. फतवे घोषित करणारे मौलवी समाजद्रोही आणि धर्मद्रोहीच आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या अग्रलेखातून केले. काही दिवसांपूर्वी ‘नाहीद आफरीन या १० वीत शिकणार्‍या मुलीने सार्वजनिक ठिकाणी गाऊ नये’, असा फतवा काढण्यात येऊन त्यावर ४६ मौलवींनी स्वाक्षर्‍या केल्या होत्या. या घटनेविषयी १६ मार्च या दिवशीच्या दैनिक सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला होता.
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,
१. मुसलमान समाजाची दुर्दशा, निरक्षरता यांविरुद्ध कधी मौलवींनी फतवे जारी केल्याचे ऐकिवात नाही. आतंकवादी कारवायांपासून दूर रहा, असा शहाणपणाचा समादेश देणारा फतवाही कधी जारी होत नाही.
२. फतव्यावर स्वाक्षर्‍या करणार्‍या ४६ मौलवींपैकी मूळ आसामी किंवा हिंदुस्थानी मौलवी किती आहेत आणि बांगलादेशी मौलवी किती हेदेखील पहायला हवे.
३. कायद्याच्या राज्यात आणि लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारे फतवे जारी करणे, हेच मुळात अवैध आहे. मुसलमान समाजात एक प्रकारे समांतर न्यायव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी या फतव्यांचा वापर होत आला आहे. अशी तालिबानी फर्माने सोडणार्‍या मौलवींना पकडून त्यांना कठोर शासन केल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत.
४. नाहीद आफरीनसारखी नवोदित गायिका किंवा महिलांवरच तालिबानी फतव्यांच्या कुर्‍हाडी कोसळत असतात. असे फतवे काढणार्‍या मौलवींच्या मुसक्या आवळून त्यांना एकदा हिंदुस्थानची राज्यघटना शिकवावीच लागेल.

Monday, January 30, 2017

शासकीय कार्यालयांमध्ये धार्मिक उत्सव आणि देवतांच्या प्रतिमा यांवर अद्याप बंदीच !

मुंबई – 
वर्ष २००२ चे मूळ परिपत्रक कायम, केवळ ४ जानेवारी २०१७ चे परिपत्रक रहित

शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये धार्मिक उत्सव साजरे करण्यास बंदी घालणारे आणि देवतांच्या प्रतिमा सन्मानाने काढून घेण्याविषयीचे ग्रामविकास खात्याच्या कक्ष अधिकार्‍याने ४ जानेवारी या दिवशी पाठवलेले पत्र मागे घेण्यात आले आहे. असे असले, तरी याच विभागाचे वर्ष २००२ मधील मूळ परिपत्रक कायम आहे, अशी माहिती ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी दिली. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शासनाने मान्य केलेल्या राष्ट्रीय-राज्यस्तरीय नेत्यांच्या छायाचित्रांच्या व्यतिरिक्त अन्य राजकीय नेत्यांची छायाचित्रे आणि देवतांची चित्रे लावणेही अवैध ठरणार आहे.
गुप्ता यांनी सांगितले की, वर्ष २००२ मधील या संदर्भातील विषयांच्या शासन धोरणामध्ये कोणताही पालट करण्यात आलेला नाही. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके आणि शासन निर्णयांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे मूळ परिपत्रकाचा अंमल कायम रहाणार आहे.


ही जनतेची शुद्ध धूळफेक नव्हे का ? सरकारने असे करणे, ही दुट्टप्पीपणाची भूमिका आहे ! राज्यशासनाने वर्ष २००२ चे मूळ परिपत्रकही रहित करावे आणि तसे जाहीर करावे अन्यथा मूळ परिपत्रक रहित होईपर्यंत धर्माभिमानी हिंदूंना आंदोलन चालूच ठेवावे लागेल !

Saturday, January 14, 2017

आमदार नीतेश राणे यांची ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना धमकी - (म्हणे) ‘कोकणात ‘हे राम नथुराम’ या नाटकाचे प्रयोग विचार करून करा !’

मुंबई – 
he-ram-nathuram_320
कोकणात ‘हे राम नथुराम’ या नाटकाचे प्रयोग कराल, तर विचार करून करा’, अशी धमकी काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांना दिली आहे. या नाटकाच्या निमित्ताने श्री. शरद पोंक्षे सध्या कोकण दौर्‍यावर आहेत. सध्या कुडाळ, मालवण आणि कणकवली या ठिकाणी नाटकाची तिकीट विक्री थांबवण्यात आली आहे. यापूर्वी कोल्हापूर येथे संभाजी ब्रिगेडने या नाटक सादर न करण्याविषयी धमकी दिली होती; मात्र या धमकीनंतरही कोल्हापूर येथे या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. नीतेश राणे यांच्या धमकीविरोधात श्री. शरद पोंक्षे यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. पुणे येथील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याविषयीही मागील वर्षी आमदार नीतेश राणे यांनी आवाहन केले असल्याचे समोर आले होते

Saturday, December 24, 2016

राम मंदिर बांधा आणि त्याचे श्रेय घ्या ! - उद्धव ठाकरे



 मुंबई - स्थानकाच्या नावाचे श्रेय कसले घेता ? अयोध्येत राममंदिर बांधा आणि त्याचे श्रेय घ्या. त्याला मी हिंमत म्हणेन, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून सांगितले. मुंबईतील पश्‍चिम रेल्वेवरील राम मंदिर रेल्वेस्थानकाचे उद्घाटन २२ डिसेंबरला झाले. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. ठाकरे यांनी हे विधान केले.

Thursday, December 8, 2016

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रात नाही तर कुठे दाखवायचा ? - श्री. योगेश चिले, हिंदवी सेना


 आझाद मैदानावर दंगलखोरांना अनुमती मिळते; मात्र अफझलखान वधाचा इतिहास दाखवण्यासाठी पोलीस अनुमती नाकारतात. येथे उपस्थित धारकर्‍यांपैकी एकतरी जण दंगलखोर वाटतो का ? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रात नाही तर कुठे दाखवायचा, असा संतप्त प्रश्‍न हिंदवी सेनेचे श्री. योगेश चिले यांनी केला. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. त्यांनी व्हॉट्स अ‍ॅप द्वारे समाजात पसरवण्यात येणार्‍या खोट्या इतिहासाला बळी न पडण्याचे, तसेच सत्य इतिहास समजून घेण्याचे आवाहन केले. एकूण ४ ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यात आले. कार्यक्रमाला ५०० हून अधिक जणांची उपस्थिती होती. धारकरी पुरुषोत्तमराव बाबर यांनी गडकोट मोहिमची माहिती दिली. धारकरी गिरीधरराव बाबर आणि गणेशराव सापते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 
     पोलिसांच्या हस्ते ध्वजाला हार घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्येयमंत्र म्हणण्यात आला. धारकर्‍यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक आणि पोवाड्यावर अफझलखान वधाचे पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. 

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.