अखिल भारतीय पंचम हिंदू अधिवेशन
आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्यांतून २७ हिंदुत्ववादी सहभागी होणार !
भाग्यनगर येथील सोमाजीगुडा पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत
हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन यांनी मागील ४ अधिवेशनांतील
फलनिष्पत्ती आणि आता होणार्या हिंदु अधिवेशनाच्या स्वरुपाविषयी माहिती
दिली. आंध्रप्रदेश आणि तेलंगण या राज्यांतून २७ कृतीशील हिंदुत्ववादी या
अधिवेशनात सहभागी होणार, अशी माहिती श्री. जनार्दन यांनी दिली. या पत्रकार
परिषदेत तेलंगण राज्यातील शिवसेनेचे अध्यक्ष श्री. टी.एन्. मुरारी, गोरक्षा
दलाचे श्री. ए. नरेश आणि शक्ती केंद्राचे संस्थापक तथा लेखक डॉ. के.वि.
सीतारामय्या आणि हिंदुत्ववादी श्री. अर्जुन उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य निमंत्रक श्री. गुरुप्रसाद यांचे आवाहन
हिंदूंच्या समस्या दूर होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक !
मंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य निमंत्रक श्री.
गुरुप्रसाद यांनी पत्रकार परिषदेत अखिल भारतीय पंचम हिंदु अधिवेशनाविषयी
माहिती दिली. हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्या पक्षाच्या शासनात हिंदूंच्या
समस्या सुटल्या नाहीत. अयोद्धेतील राममंदिर, काश्मीरमधील हिंदूंच्या
समस्या, गोहत्या आदी समस्या आहे तशाच आहेत. उलट काही समस्या आणखी वाढल्या
आहेत. यासाठी सर्व हिंदु संघटनांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे, असे
आवाहन श्री. गुरुप्रसाद यांनी केले. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे
अधिवक्ता दिनेश नाईक आणि सनातन संस्थेच्या सौ. संगीता प्रभु उपस्थित
होत्या.
भाग्यनगर येथे पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदू अधिवेशनाविषयी भाग्यनगर येथील पत्रकारांमध्ये उत्सुकता होती.
येथील पत्रकार परिषदेला पत्रकारांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. एकूण ८
वृत्तवाहिन्या आणि १३ वृत्तपत्रे यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेला उपस्थित
होते.
Post a Comment